pandit khadke.jpg 
नाशिक

धक्कादायक! मुलीच्या विवाहात प्रियकराच्या अडथळ्याची भिती...म्हणून आईनेच केला गेम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ घोटी : ओंडली ( ता. इगतपुरी) शिवारात सापडलेल्या अज्ञात मृताची ओळख पटवीत अवघ्या तासाभरात खुनाची उकल करून दोघा संशयितांना अटक करण्यात घोटी पोलिसांना यश आले. मुलीच्या विवाहात अडसर ठरेल या भितीने मुलीच्या आईने हा खून घडविल्याचे पुढे येते आहे. 

मुलीच्या विवाहात तो अडसर ठरेल म्हणून...
तळेगाव कातोरेवाडी (ता. इगतपुरी) येथील संशयित आरोपी चांगुनाबाई गणपत मेंगाळ (वय 40) यांची मुलगी छकुली हिच्याबरोबर मृत पंडित ढवळू खडके (वय 19)  प्रेमसंबंध असल्याचा संशय चांगुनाबाईला होता. त्यात छकुलीचे लग्न ठरल्याने पंडित लग्नात अडथळा आणेल या हेतूने चांगुनाबाईने नात्यातील विलास प्रथम गावंडा (वय 21, रा. बोटोसी, मोखाडा, जि. पालघर) याच्याशी संपर्क साधून त्याच्या मित्रांच्या मदतीने (ता. 26 मे) दरम्यान पंडित खडके याला वैतरणानगरला बोलावून घेत, गळा आवळत ठार करून वन विभागाच्या जंगलात पुरवा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह फेकून दिला, असे पोलिसांच्या सकृत्‌दर्शनीच्या तपासात पुढे आले आहे. 

असा लागला शोध 
मृतदेहाबाबत गावकामगार पोलिसपाटलांनी हवालदार सुहास गोसावी यांना माहिती दिल्यावर घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. पण केवळ पाय आणि कपडेच आढळून आलेला हा मृतदेह भटक्‍या कुत्र्यांनी छिन्नविछिन्न केला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व जिल्ह्यातील अनेक बेपत्ता केसची श्री. गोसावी यांनी माहिती घेत इगतपुरी पोलिस ठाण्यात 15 दिवसांपासून लंगड्याचीवाडी येथील पंडित खडके बेपत्ता असल्याचे कळताच त्याच्या आई-वडिलांना बोलावून 
कपडे व चप्पल दाखविण्यात आल्यावर मृतदेह पंडित याचाच असल्याची खात्री झाली. तसेच मृताला संशयितांनी काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याचे सांगण्यात पुढे आले. 

खुनाचा एक तासातच छडा

पोलिसांनी मोबाईल सीडीआर व संशयितांना ताब्यात घेतले असता चांगुनाबाई व विलास यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, खुनात सहभागी इतर आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी अरुंधती राणे यांनी घटनास्थळी भेट दिली. खुनाचा एक तासातच छडा लावल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे व हवालदार सुहास गोसावी यांचे कौतुक केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : ८ चेंडूंत ३ विकेट्स! अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड अपयशी... जेकब डफीने सामन्याला दिली 360 डिग्री कलाटणी

Pune Crime : देवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार; भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Balapur Crime : दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Akola News : ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये अकोला एसपी कार्यालयाला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते एसपी अर्चित चांडक यांचा गौरव

SCROLL FOR NEXT