Farmer esakal
नाशिक

वैयक्तिक हेवेदाव्यांमुळे चाललेल्या महसूलच्या आंदोलनात बळीराजा वेठीस

शशिकांत पाटील

न्यायडोंगरी (जि. नाशिक) : राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर डुबल यांनी ग्रुपवरील टाकलेल्या मॅसेजवरून राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा तलाठी समन्वयक जगताप यांनी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून यंत्रणेतील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. वैयक्तिक हेवेदाव्यांत मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरल जात असल्याने हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

सर्वसामान्य शेतकरीच वेठीस का?

वैयक्तिक हेवेदाव्यांत गुरफटलेल्या महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रासदायकच ठरत आहे. उठसूट कामावर बहिष्कार, संप यासारख्या आंदोलनाविरुद्ध कठोर उपाययोजना राज्याचे महसूल मंत्रालय का करत नाहीत, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो. तुमच्या प्रशासकीय अडचणी तुम्ही तुमच्या स्तरावर मिटवाव्यात, संपाचे हत्यार उपसून सर्वसामान्य शेतकरीवर्गाला का वेठीस धरता असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहे. तलाठी नैसर्गिक आपत्ती व निवडणुकीसंदर्भात कामे करीत असले तरी सामान्य शेतकरी वर्गाच्या संबंधित सातबारा उतारे, बँकांच्या कर्जाचे बोजे, ई - पीक पाहणी, उत्पन्न दाखले व तत्सम संबंधित कामे या संपामुळे ठप्प आहेत.

राज्यभरातील शेतकरी विभागाच्या कामाबद्दल नाराज

या अगोदरही पीएम किसान योजनेवर बहिष्कार टाकत तलाठ्यांनी सहा महिने काम बंद केले होते. यानंतर राज्यभरातील शेतकरी वर्गाकडून तलाठी विभागाच्या कामाबद्दल नाराजीचा सूर व टीकेची झोड उठल्यानंतर कृषिमंत्री व महसूल मंत्र्यांनी बैठक पीएम किसान योजनेचे कामकाज सुरळीत करण्यासंदर्भात निर्णय घेत बहिष्कार मागे घेतला होता. त्यातील धुरळा जमिनीवर बसत नाही तोच पुन्हा तलाठ्यांनी पुकारलेला संप एकूणच त्रासदायक ठरत आहे.

दोन दिवसात पुढील दिशा...

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे नेमके दुखणे काय आहे, यावर महसूल यंत्रणा व महसूल मंत्र्यांनी समीक्षण करून त्यावर रामबाण उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर डुबल यांच्याशी संपर्क साधला असता ते रामदास जगताप यांच्या कार्यवाहीवर ठाम असल्याचे दिसून आले. आम्ही वरिष्ठांकडे यासंदर्भात मागणी केली असून, दोन दिवसात पुढील दिशा ठरवू, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT