नाशिक

महसूल लोक अदालत

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- साक्रीत आज महसूल लोक अदालतीचे आयोजन -- प्रलंबित दावे तडजोडीने निकाली काढण्याची संधी सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २ : क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साक्रीत मंगळवारी (ता. ३) महसूल लोक अदालत होणार आहे. या अभियानांतर्गत साक्री तहसील कार्यालयात सकाळी दहाला विशेष लोक अदालत होणार आहे. महसूल प्रशासनातील विविध अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये वहिवाट रस्त्यांशी संबंधित अर्ज, अपील व इतर प्रकरणे प्रलंबित राहिल्यामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व आपसातील तडजोडीने हे महसुली दावे जलद गतीने निकाली काढण्यासाठी साक्री तहसील कार्यालयामार्फत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या लोक अदालतीत वहिवाट रस्त्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांवर तडजोडीद्वारे अंतिम आदेश पारित करून प्रकरणे कायमस्वरूपी निकाली काढली जाणार आहेत. त्यामुळे वेळेची व पैशांची बचत करण्यासाठी जास्तीत जास्त पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि विहित नमुन्यातील ‘प्रपत्र-अ’ अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांनी साक्री तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरुख खानच्या बहिणीला पाहिलंत का? प्रसिद्धीपासून दूर, काय करते किंग खानची सख्खी बहीण?

सूर्याच्या राशीबदलाने ८ राशींचे अच्छे दिन! नोकरी, पैसा अन् व्यवसायात होणार मोठे बदल

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकाची भरारी! PSI, नायब तहसीलदार ते DySP जिद्दीचा प्रवास; शिवप्रसाद पारवेंची स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी कहाणी..

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

SCROLL FOR NEXT