Indian post  esakal
नाशिक

India Postal Department : 20 देशांमध्ये दिवाळी फराळाचा सुगंध दरवळला

- युनूस शेख

जुने नाशिक : २० देशांमध्ये दिवाळी फराळाचा सुगंध टपाल विभागाच्या पार्सल सेवेमुळे दरवळला. त्यातून विभागास सुमारे दोन लाख १४ हजारांचा महसूल मिळाला. शहर- जिल्ह्यातील काही हिंदू बांधव नोकरी, शिक्षणनिमित्त विदेशात वास्तव्यास आहे. त्यांना दिवाळी सणासाठी येणे शक्य होत नाही. (Revenue of 2 lakh 14 thousand to Nashik Postal Department Transport of Diwali Snacks to 20 Countries Nashik Latest Marathi News)

अशा बांधवांना दिवाळीच्या फराळास मुकावे लागते. अशा बांधवांच्या कुटुंबीयांकडून टपाल पार्सल सेवा माध्यमातून फराळ त्यांच्यापर्यंत पोचवले जातात. गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे विदेशातील बांधवांना या आनंदापासून मुकावे लागले होते. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने पार्सल सेवादेखील कोलमडली होती. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू आहे. त्यामुळे टपाल विभागाची पार्सल सेवादेखील पूर्ववत झाली.

यामुळे फराळ विदेशातील बांधवांपर्यंत पोचण्याचा मार्ग मोकळा झाला होता. याची संधी साधत यंदा नागरिकांनी टपाल विभागाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान यासह अन्य विविध २० देशांत असलेल्या आपल्या कुटुंबांच्या सदस्यांपर्यंत दिवाळी फराळ पोचविले. यातून टपाल विभागास सुमारे दोन लाख १४ हजार ७२२ महसूल प्राप्त झाला. यंदा फराळाचे सर्वाधिक पार्सल जपान या ठिकाणी पाठवण्यात आले.

त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत सर्वाधिक पार्सल पाठविण्याचे प्रमाण होते. २० देशात सुमारे ५३ दिवाळी फराळाचे पार्सल गेल्याची माहिती टपाल विभागाकडून देण्यात आली. यामुळे सध्या विदेशात वास्तव्यास असलेल्या ५३ भारतीय बांधवांना दिवाळी फराळ आणि दिवाळीचा आनंद घेता आला.

देशनिहाय पार्सल

देश पार्सल संख्या
जपान १०
ऑस्ट्रेलिया ०८
अमेरिका ०७
रशिया ०३
दुबई ०१
बोष्टबॉड ०२
लंडन ०१
सौदीअरेबिया ०२
न्यूयॉर्क ०३
जर्मनी ०१
हंगेरी ०१
डेन्मार्क ०१
आयर्लंड ०१
कॅनडा ०१
स्वझर्लंड ०१
जॉर्जिया ०१
अमोरी ०१
इजिप्त ०१
अन्य ०५

"टपाल विभागाच्या माध्यमातून विदेशातील भारतीय बांधवांपर्यंत दिवाळी फराळ रूपात कुटुंबीयांच्या शुभेच्छा पोचविण्याची संधी मिळाली. नागरिकांनी विभागावर विश्वास दर्शवून ही संधी दिली. याचे समाधान वाटते. याच पद्धतीने अन्य सुविधांसाठीही नागरिकांच्या सेवेत राहू. "
- रामसिंग परदेशी, वरिष्ठ पोस्टमास्टर, जीपीओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT