नाशिक

मुख्याध्यापकांचे निलंबन मागे घ्या

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 34361 धुळे : पारधीवस्ती शाळेच्या मुख्याध्यापकांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी वैभव बाचकर यांना देताना पुरोगामी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी. -- पारधीवस्ती शाळेच्या मुख्याध्यापकांचे निलंबन मागे घ्या -- पुरोगामी शिक्षक संघटनेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : पारधीवस्ती (ता. धुळे) जिल्हा परिषद शाळा येथे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अचानक भेटीदरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या कारणावरून मुख्याध्यापकांवर केलेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक असून ती तत्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी वैभव बाचकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मंत्री भुसे यांनी शाळेच्या केलेल्या अचानक पाहणीत शाळेत काही त्रुटी आढळल्याने मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले. मात्र संबंधित मुख्याध्यापक आजारी असल्याने उपचारासाठी नियमितपणे वैद्यकीय तपासणीसाठी जात असतात. घटनेच्या दिवशीही ते उपचारासाठी गेल्यामुळे शाळेत पोहोचण्यास त्यांना उशीर झाला होता. चुकीच्या कामांना कधीही पाठीशी घालणार नाही. परंतु, कारवाई करताना वस्तुस्थिती आणि संबंधित शिक्षकांची बाजू तपासणे आवश्यक होते, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. विशेष म्हणजे या मुख्याध्यापकांनी स्वतःच्या खिशातील ५० ते ६० हजार रुपये खर्च करून शाळेची रंगरंगोटी, अंतरंग व बाह्यांग सुधारण्याचे कार्य केले आहे. शाळेला संरक्षण भिंत नसल्यामुळे आवारात जनावरांचा वावर असतो, ज्यामुळे अस्वच्छता निर्माण होते. स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकांबद्दल कोणतीही तक्रार नसून ते नियमितपणे अध्यापन करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायतत्त्वांनुसार या प्रकरणाची सहानुभूतीपूर्वक चौकशी करून निलंबन रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, संघटक खुशाल चित्ते, उपाध्यक्ष गुलाब वाघ, महानगर सचिव ललित वाघ, प्रसिद्धी प्रमुख मुरलीधर नानकर, महिला अध्यक्षा सुरेखा बोरसे, महिला सरचिटणीस प्रतिभा वाघ, तालुका सरचिटणीस भारती भदाने, कार्याध्यक्षा स्मिता पाटील, मंगला पगारे, मनीषा परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

Pune Metro: बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानकांना डावलल्याने नागरिक रस्त्यावर; मेट्रो सुरू करण्यास विरोध, आंदोलनकर्ते ताब्यात

IND vs NZ : विराट कोहली न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार? सेहवागलाही मागे टाकण्याची संधी

SCROLL FOR NEXT