rice farming esakal
नाशिक

ऐन बहरात आलेली भात शेती संकटात; बळीराजाचे डोळे आकाशाकडे

विजय पगार

इगतपुरी (नाशिक) : तालुक्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे ऐन बहरात येणारी आलेली भातशेती संकटात सापडली आहे. सध्या भाताच्या रोपांची वाढ खुंटली आहे. भातासह इतर रोपांना या काळात पाण्याची अत्यंत आवश्यकता असते, मात्र पाऊसच गायब झाल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.( Rice-farming-in-crisis-Waiting-for-heavy-rain-nashik-marathi-news)

दमदार पावसाची सर्वत्र प्रतीक्षा; बळीराजाचे डोळे आकाशाकडे

दरम्यान, पावसाअभावी तालुक्यात काही भागात भाताचा रोप करपू लागली आहे. याचा परिणाम पुढील काळात होणाऱ्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला सरासरी ९७ टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज वर्तवला होता. या आनंद वार्तामुळे बळीराजा सुखावला होता. त्यानुसार जूनच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील चार ते पाच तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पाऊस पडलेला नाही. सुरवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जूनच्या सुरवातीला मान्सूनपूर्व विद्युत पंपाद्वारे पाणी भरून अनेक शेतकऱ्यांनी भाताचे रोप टाकले होते. त्याची लागवड सद्य:स्थितीत सुरू आहे. येत्या २-३ दिवसात दमदार पाऊस न झाल्यास सुरू असलेली भात लागवड ठप्प होईल. त्याचप्रमाणे लागवड केलेली पीकदेखील पिवळे पडून नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्हा अजूनही कोरडाच :

पावसाळा सुरू झाल्यापासून अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसावर खरिपाची पिके हिरवी दिसत असली तरी त्यांचा उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. येवला, देवळा, नांदगाव, मालेगाव, सटाणा, सिन्नर आदी तालुक्यांमध्ये सोयाबीन, मका बाजरीची पेरणी झाली असली तरी अपेक्षित असा पाऊस होत नसल्याने पिके करपण्याची शक्यता वाढली आहे. इगतपुरी, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा आदी तालुक्यांमध्ये थोड्या फार प्रमाणात पाऊस झाल्याने समाधान असले तरी पिकांची चिंता मात्र वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT