A farmer family threshing paddy after harvest in the taluka. Farmers threshing rice in the second photo
A farmer family threshing paddy after harvest in the taluka. Farmers threshing rice in the second photo esakal
नाशिक

Nashik Rice Crop News: इगतपुरी तालुक्यात भात सोंगणी अंतिम टप्प्यात! मजुरीचा खर्च डोईजड

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : तालुक्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यातून सावरलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने उरल्या सुरल्या भाताची सोंगणी सुरू केली आहे. बहुतांश भागात भात सोंगणी आता अंतिम टप्यात आली आहे.

अवकाळी पावसाने वाचलेले भात पीक कीडरोगाच्या प्रादुर्भावात सापडले आहे. यामुळे तालुक्यात सर्वत्र भात पिकास रोगराईने ग्रासल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे. शेतकरी अगोदर कमी पावसाने हैराण झाला होता.

आता डोळ्यांसमोर पिकाचा झालेला पाचोळा पाहून हवालदिल झाला आहे. त्यात वाढलेल्या मजुरीचा खर्च पाहता सोंगणी करणे तोट्याचे होतेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Rice harvest in Igatpuri taluk in final stage Labor cost increased nashik agriculture news)

अवकाळी पावसाने शेतीत नुकसान झाले, तरी शासनाचे शेतकऱ्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले असून, मागील वर्षी झालेल्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

तालुका कृषी खाते आणि पंचायत समितीचा कृषी विभाग असतानाही येथील बळीराजा दुर्लक्षित आहे. संकट येताच परस्परांकडे बोट दाखविले जाते, ही वस्तुस्थिती असल्याचे शेतकरी सांगतात.

भातशेती अगोदरच आतबट्ट्याचा धंदा समजला जातो. पेरणीपासून ते सोंगणीपर्यंतचा खर्च दिवसोंदिवस वाढत आहे. यंदा औषधांच्या खर्चाचा भुर्दंड बसल्यामुळे तोटा वाढला आहे.

पेरणीपूर्व मशागत आणि आवणीस किमान ४ ते ५ हजार रुपये ट्रॅक्टर मजुरी लागते. मजुरी खर्च साधरणत: आवणीसाठी १० ते १२ हजार रुपये, निंदणीसाठी ३ ते ४ हजार रुपये, तर सोंगणीसाठी ६ ते ८ हजार रुपये आहे.

बी-बियाणे, खते यांना २ ते ३ हजार रुपये, असा सरासरी एकूण २५ ते ३० हजार रुपये ठोक खर्च येतो. भाताचे एकरी उत्पन्न १० ते १२ क्विंटलच्या आसपास आहे. मुरमाड जमिनीत ते यापेक्षा कमी आहे.

तालुक्यातील जमिनीची प्रतवारी पाहता हळीव वाणाच्या भाताचे प्रमाण अधिक आहे आणि हळ्या भातांना भाव कमी मिळतो. भाताला प्रतिक्विंटल २ हजार रुपये भाव मिळाला, तरी अवघे २० ते २२ हजार रुपये हाती पडतात.

शेतात शेतकरी कुटुंबीयांसह राबतो आणि मजुरी खर्च कमी करतो. भाताबाबत अद्याप शेतकरी उदासीन झालेला नाही. मात्र, नागली, वरई, खुरसणी आदी पिकांची लागवड कमी झाली आहे.

या वर्षी २७ हजार ९०० हेेक्टरवर पेरणी झाली आहे. साधारणतः १० वर्षांपूर्वी ३० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते, ते कमी होत आता २७ हजार झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT