नाशिक

माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करावा : कुलकर्णी

CD
माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करा --- तहसीलदार कुलकर्णी यांचे नागरिकांना आवाहन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या कामकाजासंदर्भातील उपलब्ध माहिती मागविण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा प्रभावीपणे वापर करताना अर्जाची योग्य पद्धत, संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याची भूमिका, प्रथम अपील प्राधिकारी, तसेच विहित कालमर्यादेची माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी केले. नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालयात माहिती अधिकार अधिनियम, २००५ बाबत जनजागृतीसाठी ‘माहिती अधिकार दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी तहसीलदार कुलकर्णी बोलत होते. या वेळी अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) अरविंद लोखंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार कुलकर्णी यांनी माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यालयीन अभिलेखांचे सुयोग्य व्यवस्थापन, माहितीचे वर्गीकरण, तसेच अभिलेखांचे जतन व प्राप्त माहिती अधिकार अर्जांबद्दल माहिती दिली. तसेच, नागरिकांना आवश्यक माहिती सुलभतेने उपलब्ध करून देणे, शासकीय कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता आणणे आणि प्रशासन व नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करणे, हा माहितीच्या अधिकाराचा प्रमुख उद्देश असल्याचे या वेळी त्यांनी नमूद केले. प्रारंभी माहितीच्या अधिकाराच्या उद्दिष्टांची माहिती देण्यात आली. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व वाढविणे, तसेच प्रशासनात नागरिकांचा सहभाग अधिक प्रभावी करण्यासाठी माहितीच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT