Temperature rise esakal
नाशिक

Monsoon Temperature Rise: तापमानात वाढ; बसतोय उन्हाचा चटका! पावसाळ्यात घामाच्या धारा

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Temperature Rise : यंदा हवामानाने वेगळेच वळण घेतले आहे. पावसाळा सुरू असताना उन्हाचा चटका बसत आहे. उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने पावसाळा की उन्हाळा, असा प्रश्न पडत आहे.

पाऊस संपल्यात जमा असून, तापमानाचा पारा वाढू लागला आहे. काही दिवसांपासून अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. (Rise in temperature heat of sun during monsoon season nashik)

नक्षत्रात पाऊस पडला तर एवढा पडतो, की बाहेर तोंडही काढू देत नाही आणि पडला नाही तर ढगाकडे बघत बसण्याची वेळ येते. यंदाच्या पावसाळ्यात बुधवारी (ता. ३०) सरलेल्या नक्षत्राने ढगाकडे बघण्याची वेळ आणली आहे.

गुरुवारी (ता. ३१) सकाळी साडेनऊला पूर्वा नक्षत्राचे मोरावरून आगमन झाले. हवामान तज्ज्ञांनी या नक्षत्रात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

पाऊस पडल्यास उगवून आलेले थोडे-बहुत खरीप हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र, पूर्वा नक्षत्राचीही सुरवात आशादायक झालेली नाही.

निफाड तालुक्यात मध्यंतरीच्या ‘फवारा’ पावसाने टोमॅटो, सोयाबीन, मका आदी पिके काही प्रमाणात तरारली होती. मात्र, पाच दिवसांपासून तापणाऱ्या उन्हामुळे पिकांनी माना टाकायला सुरवात केली आहे.

सध्या पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू आहे. अशात पाऊस झाला तर शेतीला आणि पशुपालकांना थोडाफार फायदा होऊ शकतो. मात्र, पावसाअभावी तापमानात वाढ होत आहे. निफाड तालुक्यात शनिवारी (ता. २६) २८ अंश सेल्सिअस तापमान होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रविवार (ता. २७)पासून अंशाअंशाने तापमान वाढत आहे. रविवारी ३०, सोमवारी ३१.४ अंश सेल्सिअस तापमान होते.

मंगळवारी ३०.५ अशी किंचित घट होऊन बुधवारी (ता. ३०) तापमानाचा पारा चक्क ३०.७ अंश सेल्सिअसवर, तर गुरुवारीही ३१ अंश सेल्सिअस पारा होता. तापमानाचा पारा वाढल्याने बसतोय ‘उन्हाचा चटका, भर पावसाळ्यात घामाच्या धारा’, अशी स्थिती सध्या आहे.

सहा नक्षत्र सरले, पाचवर आशा

पावसाचे प्रमुख सहा नक्षत्र संपले, तर गुरुवारपासून पूर्वा नक्षत्र सुरू झाले. तेही पहिल्या दिवशी कोरडेच गेले. अद्याप पावसाचे पाच प्रमुख नक्षत्र बाकी आहेत.

यात उत्तरा, हस्त, चित्रा आणि शेवटचे स्वाती नक्षत्र २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ‘पडतील स्वाती, तर पिकतील मोती’, अशी म्हण आहे, ही म्हण खरी ठरो, अशी बळिराजा मनोमन ईश्वराकडे प्रार्थना करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT