क्रीडापानासाठी
------------
ऋषिकेशचे डावात सहा,
रोहनचे सामन्यात तीन बळी
सी. के. नायडू चषक ः महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे सामन्यात कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३०ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च्या २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू चषक स्पर्धेत महाराष्ट्रविरुद्ध रेल्वे यांच्यातील सामना झाला. या सामन्यात महाराष्ट्र संघातर्फे नाशिकच्या जलदगती गोलंदाज ऋषिकेश कातकाडेने डावात ६ बळी घेतले. तर नाशिकचा डावखुरा जलदगती गोलंदाज रोहन शेडगेने रेल्वे संघातर्फे पदार्पण करताना सामन्यात ३ बळी घेतले.
सोलापूर येथे झालेल्या या चार दिवसीय सामन्यात महाराष्ट्राच्या ऋषिकेशने पहिल्या दिवशी ४ तर दुसऱ्या दिवशी आणखी २ असे रेल्वेच्या पहिल्या डावात एकूण ६ बळी घेतले. २२ षटकात ५ निर्धाव तर एकूण ८८ धावा देतांना ६ गडी बाद केले. तरीदेखील रेल्वेने ९ बाद ४५१ धावांचा डोंगर रचला. उत्तरादाखल महाराष्ट्राच्या पहिल्या डावात सर्वबाद १३४ धावा करता आल्या. फॉलोऑननंतर देखील दुसऱ्या डावात महाराष्ट्राचे फलंदाज १४० पर्यंत मजल मारू शकले. रोहन शेडगेने रेल्वेच्या संघाकडून पहिल्या डावात २ व दुसऱ्या डावात १ बळी घेऊन रेल्वे संघाच्या १ डाव व १७७ धावांच्या मोठ्या विजयास हातभार लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.