नाशिक

कॅम्प भागातील मोसम नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्यासाठी ठिय्या आंदोलन

CD
सेकंड मेन --- फाेटो - 16046 मालेगाव : रास्ता रोको आंदोलन करताना सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी. --- मोसम नदीपात्रातील अतिक्रमणाविरोधात रास्ता रोको दोन तास आंदोलन; संयुक्त मोजणीनंतर कायदेशीर कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ५ : येथील कॅम्प भागात मोसम नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. नदीपात्रातील अतिक्रमण काढावे, यासाठी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. संबंधित हद्द महापालिकेची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर सप्तंत झालेल्या पदाधिकाऱ्यांनी नवीन तहसीलसमोरील मुख्य रस्त्यावर डॉ. चैतन्य देवरे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी डॉ. चैतन्य देवरे म्हणाले, की कॅम्प भागात मोसम नदीपात्रात अतिक्रमण झाले आहे. नदीपात्रात भराव करून त्या ठिकाणी पक्की घरे बाधण्यात आली आहेत. येथील अतिक्रमण काढावे, २०११ नंतरच्या घरमालकांना नोटीस न देता त्यांचे अतिक्रमण निष्काशित करावे, आठ दिवसांत अतिक्रमण न काढल्यास जनआंदोलन छेडू, वेळ आल्यावर न्यायालयात दाद मागू, अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच येथे ‘जय भवानी, जय शिवाजी’ यांसह विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी श्‍याम देवरे, चिरंजीव सानप, अजय वाघ, रवी बाबा, अक्षय काळे यांच्यासह सकल हिंदू समाज, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी उपस्थित हाेते. रास्ता रोको आंदोलन येथील अतिक्रमण काढण्यासाठी सुमारे दोन तास भरउन्हात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मसगा कॉलेजकडे जाणाऱ्या रस्ता बंद करण्यात आला होता. नदीपात्राची संयुक्त मोजणी करून नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचे अतिक्रमण अधीक्षक बाळू धाेंडगे व पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर. एस. निकम यांनी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी तहसीलदार विशाल सोनवणे, कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT