नाशिक

River Pollution : पानवेलींनी शिव नदीचा ‘श्वास’ घुटमळला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राम तेरी गंगा मैली हो गई.... या चित्रपटातील या गीताची आठवण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील लासलगावसह तीन गावातील शिवनदीच्या काठवरील ग्रामस्थांना होत आहे. (river pollution shiva river bed is full of panveli nashik news)

पानवेली, हॉटेल व्यावसायिकांचा ओला कचरा, भाजीपाला तसेच, मोठ्या प्रमाणात टाकला जाणार कचरा यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लासलगाव, पिंपळगावनजीक, ब्राह्मणगाव विंचूर या तीन गावांच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या शिव नदीची कचराकुंडी झाली आहे. लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ असल्याने हॉटेल व्यवसाय जोरात असतो.

त्यातील ओला कचरा, भाजीपाल्याचा कचरा, मांसाहार दुकानातील कचरा, बाजार तळातील कचरा तसेच, प्लॅस्टिकला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा नदीपात्रात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यातच नदीपात्र पानवेलींनी व्यापून गेले अहे. पानवेलीसह येणारे सांडपाणी, कचऱ्यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवनदी स्वच्छ करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदन विविध संघटनांनी पाठवले.मात्र या निवेदनातील मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा करून नदीत स्वच्छता करावी. तसेच, नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवनदी काठावरील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT