Accident case esakal
नाशिक

उड्डाणपुलावरील लोखंडी पट्ट्यांमुळे अपघातास निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : उड्डाणपूल आणि त्यावरील लोखंडी पट्ट्या वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे. गेल्या आठ दिवसात या लोखंडी पट्ट्यांवरून वाहने घसरून चार ते पाच अपघात झाले आहे. त्यात एकाचा मृत्यू, तर अन्य जन गंभीर जखमी आहे.

उड्डाणपुलावर बऱ्याच ठिकाणी लोखंडी पट्ट्यांचा वापर करण्यात आला आहे. पट्ट्यांचा काही भाग तुटला आहे. त्या पट्ट्यांवरून वाहने घसरून अपघात होत आहे. पावसाच्या पाण्यामुळे तर त्या अधिकच धोकादायक झाल्या आहे. गेल्या आठ दिवसात चार ते पाच दुचाकी घसरून अपघात झाले आहे. गुरुवारी (ता. २३) रात्री अशाच प्रकारे मालेगावला जाणारी दुचाकी घसरून गंभीर अपघात झाला.

त्यात जैनऊलबेद्दीन नामपूरवाला यांचा मृत्यू झाला. तर महम्मद अन्वर महम्मद यांची तब्येत गंभीर असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. यापूर्वी झालेले अपघातातील काही जण गंभीर जखमी झालेले आहेत. भद्रकाली पोलिसांकडून त्या पट्ट्याची दुरुस्ती करत वाहने घसरणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे पत्र राज्य व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागास देण्यात आले आहे. अद्याप त्यांच्याकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे.

दुसरीकडे वाहतूक पोलिसांचेदेखील दुर्लक्ष होत असल्याने संपूर्ण उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनत आहे. उड्डाणपुलावरून वाहन चालवत असताना किती वेग मर्यादा हवी, सध्या किती वेग मर्यादेने वाहने चालवली जात आहे, याकडे पोलिसांचे लक्ष नाही.

शिवाय दुचाकी वाहनांना उड्डाणपुलावर बंदी असताना सर्रास दुचाकी चालक उड्डाणपुलाचा वापर करत अतिशय वेगात दुचाकी चालवत आहे. त्याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. शिवाय पोलिसांची उड्डाणपुलावर नियुक्ती नसल्याने चारचाकीसह मोठे वाहनाचा अधिक वेगात असल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाने लोखंडी पट्ट्यांचे नियोजन करावे. तर पोलिसांनी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणावे, दुचाकीस उड्डाणपूल बंद करण्यात यावा. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT