नाशिक

कॉलनी रस्त्यासाठी ८० टक्के निधी राखीव ठेवा

CD
टूडे साठी (फरांदे फोटो घ्यावा.) ----------- कॉलनी रस्त्यासाठी ८० टक्के निधी राखीव ठेवा आमदार फरांदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांची कामे सुरू असताना त्याचा भार अंतर्गत कॉलनी रोडवर पडला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वापर झाल्याने अनेक कॉलनी रोड उखडले असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका अर्थसंकल्पात रस्ते विकासासाठीच्या एकूण तरतुदीपैकी किमान ८० टक्के निधी केवळ कॉलनी रोडच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुख्य रस्त्यांची कामे सुरू झाल्यापासून जड वाहतूकही कॉलनी रोडवरून वळविली. त्यामुळे अनेक भागांतील डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. काही ठिकाणी रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची स्थिती आहे. याचा फटका दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना खड्ड्यांमधून मार्ग काढताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. मुख्य रस्त्यांच्या विकासासाठी कॉलनी रोडचा वापर केला गेला, पण त्यांची दुरवस्था झाल्यानंतर दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष झाले, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. यातून नाराजी व्यक्त होत आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात मोठी विकासकामे होत असताना केवळ मुख्य रस्तेच चांगले करून चालणार नाही, तर प्रत्येक वसाहतीतील अंतर्गत रस्ताही सुस्थितीत असला पाहिजे, अशी भूमिका आमदार फरांदे यांनी मांडली आहे. शहरातील सर्व प्रभागांमधील खराब कॉलनी रोडचे प्राधान्यक्रमाने सर्वेक्षण करावे. त्यानंतर गरजेनुसार डांबरीकरण, काँक्रिटीकरण किंवा संपूर्ण पुनर्निर्माणाची कामे हाती घ्यावीत, अशीही त्यांनी मागणी केली आहे .या कामांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी आणि राखीव निधी दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वळविला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पत्रात नमूद आहे. --------------चौकट रस्ते गुणवत्ता तपासावी रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता नियमितपणे तपासावी आणि ठरलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.आगामी अर्थसंकल्पात कॉलनी रोडसाठी ८० टक्के निधी राखीव ठेवून कालबद्ध कृती आराखडा तयार करावा आणि प्रत्यक्ष कामांना तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे. ------------------

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

सिडकोची घरं धोकादायक, पाच वर्षांतच इमारतींची दुरवस्था; कुठे स्लॅब कोसळतोय, तर कुठे भिंतींना तडे

SCROLL FOR NEXT