Yevla taluka police team with suspected accused. esakal
नाशिक

Nashik Crime: रस्तालूट करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या; गस्तीवेळी येवला तालुका पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : गवंडगाव शिवारातील टोलनाक्याजवळ दोन ट्रकचालकांना दमदाटी करत लुटमार करत असताना दोघा लुटारूंच्या तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यातील एकाविरुद्ध शिर्डी, लोणी राहता, कोपरगाव पोलिस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Road robbers smile Yeola taluka police action during patrolling Nashik Crime)

नाशिक ते संभाजीनगर मार्गावत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना अंदरसूल गावापुढे रस्त्यावर उभी असलेल्या ट्रकमध्ये संशयित हालचाली सुरू असल्याचे लक्षात आल्याने रात्र गस्तीवरील पोलिस इरफान शहा, ज्ञानेश्वर पल्हाळ, नितीन पानसरे, आबा पिसाळ आदींनी घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ ट्रकजवळ गेले.

पोलिसांना आलेले पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार यांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले.

उभ्या असलेल्या ट्रक (एमएच १५,डिके ००२१) वरील चालक अशोक आनंदा निकम (रा. वाखारी, ता. देवळा जि. नाशिक) याने सांगितले की, पक्षीखाद्य घेऊन जात असताना ट्रक बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला उभी केली होती.

तेव्हा दुचाकीने आलेल्या दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम लुटून नेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याबाबत तपास चालू असताना विकास विठोबा कदम (रा. गारखेडा ता. देवळगांवराज जि. बुलढाणा) यांने सांगितले, की ट्रक (एमएच १२,आरएन – ७१९९) चालवून घेऊन जात असताना अडवून कोयत्याचा धाक दाखवून दोन मोबाईल व रोख रक्कम काढून घेतल्याचे सांगितले.

संशयिताना पोलिसानी ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ लुटमार करण्यासाठी व धाक दाखविण्यासाठी लागणारा कोयता व लुटमारीचा मोबाईल व रोख रक्कम असा ४४ हजार ३२० रुपयेचा मुद्देमाल मिळून आला आहे.

संशयित सुकदेव गोरख मोरे (२७, रा. शनिमंदीर, राहता, जि. अहमदनगर), विकास मधुकर कांबळे (२४, रा. दहेगांव, ता. राहता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

सुकदेव मोरे यांच्याविरुद्ध शिर्डी, लोणी, राहता, कोपरगाव पोलिस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर हेंबाडे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT