नाशिक

राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरण कामात विकास आराखड्यांचे उल्लंघन

CD
पान एक ॲंकर ---------------- 32114 नंदुरबार : रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत बोलताना आमदार चंद्रकांत रघुवंशी समवेत आमदार आमश्‍या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी. ------------------------- राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात विकास आराखड्याचे उल्लंघन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठकीत रस्त्यांची कामे बंद पाडण्याचा इशारा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १३ : नगरपरिषद हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणात विकास आराखड्याचे उल्लंघन होत असून नागरी सुविधांच्या अभाव दिसून येत आहे. पालिकेच्या नगररचना व अभियांत्रिकी विभागासोबत संयुक्त मोजणी करून भविष्यातील शहराच्या सुनियोजित विकासासाठी स्थानिक विकास आराखड्याला अनुसरून कामे करावीत, अन्यथा सुरू असलेली रस्त्यांची कामे बंद पाडण्यात येतील, असा इशारा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.१३) जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मिताली शेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे उपस्थित होते. आमदार रघुवंशी यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. नगरपरिषद क्षेत्रांतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत विविध रस्त्यांची कामे परस्पर सुरू आहेत. या कामासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नगररचना विभाग किंवा नगर परिषदांना कोणतीही पूर्वकल्पना, माहिती दिली जात नाही किंवा चर्चा केलेली नाही. सदर रस्त्यांची मालकी थेट राष्ट्रीय महामार्गाकडे असली तरी नगरपालिकेच्या मंजूर विकास योजना व नियमानुसार सदर रस्त्यांची कामे करणे बंधनकारक व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या परस्पर सुरू असलेल्या कामांमुळे नगरपालिकेच्या अस्तित्वातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज लाइन तसेच विजेचे पोल आणि भूमिगत केबल यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पुरवठ्यात खंड पडणे, ड्रेनेज तुंबणे, वीज पुरवठा खंडित होणे सारख्या गंभीर समस्यांना सामोरे जाणे लागेल, असे आमदार रघुवंशी यावेळी म्हणाले. ---------- आपत्कालीन व्यवस्थापनात अडचणी नगरपरिषद हद्दीत कोणतीही विकास कामे करताना स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेणे बंधनकारक आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणतीही पूर्वपरवानगी किंवा समन्वय न ठेवल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आमदार सूर्यवंशी यांनी आणून दिले. ---------- बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या - राष्ट्रीय महामार्ग विभाग व पालिका प्रशासनाची समन्वय बैठक घ्यावी - स्थानिक विकास आराखड्याला बांधील राहूनच पालिकेच्या पूर्वपरवानगीने कामे हाती घ्यावीत. - नागरी सुविधांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तांत्रिक व आर्थिक तजवीज करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT