A local farmer blocked the road leading to the cremation ground at Umberkon, so the villagers were performing the last rites in front of the house.
A local farmer blocked the road leading to the cremation ground at Umberkon, so the villagers were performing the last rites in front of the house. esakal
नाशिक

SAKAL Exclusive: मृत्यूनंतरही मरणयातना संपेनात; स्मशानभूमीचा रस्ता बंद असल्याने घरासमोरच केले अंत्यसंस्कार!

ज्ञानेश्वर गुळवे

SAKAL Exclusive : स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने चक्क घरासमोरच अंत्यविधी करण्यात आला आहे. आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे.

स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने गावातील घरासमोर अंत्यविधी करण्याची वेळ मृताच्या नातेवाईकांवर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण गावामधील ही घटना आहे. (road to cemetery closed funeral done in front of house by villagers at umberkhed igatpuri nashik news)

स्मशानभूमीकडे जाणारा नेहमीच्या वहिवाटीचा रस्ता स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे हा प्रसंग ओढावला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. गावातील मयत ध्रुपदाबाई चंदर सारुक्ते या महिलेचे २०ऑगस्ट रोजी निधन झाले.

अंत्ययात्रा व अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीवर जाणारा रस्ताच स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे मृताच्या कुटुंबाने आपल्या राहत्या घरासमोर अंत्यविधी केला आहे.

या गंभीर प्रकारास संपूर्णपणे ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे मृताच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. तसेच महसूल प्रशासनाने तात्काळ रस्ता मोकळा करण्याची आग्रही मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घोटी बाजारपेठेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उंबरकोन गावातील ध्रुपदाबाई चंदर सारुक्तेया महिलेचा २० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. परंतु स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता स्थानिक ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शेतकऱ्याने बंद केल्यामुळे अंत्ययात्रेसाठी रस्ताच नव्हता.

त्यामुळे अंत्यविधीचा खोळंबा झाला होता. पाऊस सुरु असताना मृतदेहाची अहवेलना काही संपेना शेवटी घरासमोरील मोकळ्या जागेत अंत्यविधी करण्याखेरीज त्या कुटुंबासमोर पर्याय नव्हता अखेर त्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृतदेहावर घरासमोरच अंत्यसंस्कार केला.

मृताच्या नातेवाईकांनी सरपंच, सदस्य संपूर्ण ग्रामपंचायतीस जबाबदार धरले असून आता तरी हा रस्ता मोकळा करा असा टाहो फोडला आहे. स्म्शानभूमीच्या आजूबाजूला शेती असल्याने शेतकऱ्यांने तो रस्ता बंद केला आहे त्यामुळे हा रस्ता प्रशासनाने मोकळा करावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT