Rishika Chandwale sakal
नाशिक

Nashik Accident : नर्सिंग शिकणाऱ्या ऋषिकाचा अपघातात मृत्यू; वडील गंभीर जखमी

Heavy Truck Hits Two in Ramdas Swaminagar Area : नाशिकच्या रामदास स्वामीनगरात ट्रकखाली चिरडून ऋषिका चांदवले हिचा मृत्यू; वडील गंभीर, नागरिकांनी अवजड वाहनांवर बंदीची मागणी केली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक- उपनगर येथील रामदास स्वामीनगरात ट्रकखाली चिरडून ऋषिका आनंद चांदवले (वय २३) या तरुणीचा मृत्यू, वडील आनंद चांदवले गंभीर जखमी झाले. ट्रकचालक महेंद्र वाळुंज याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ऋषिका सायंकाळी सातला वडिलांसोबत कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील नर्सिंग कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली होती. त्याचदरम्यान सुरतहून चाकण (पुणे)कडे जाणारा ट्रक (एमएच १४, एचयू ८४०७) टाकळीमार्गे नाशिक रोडच्या दिशेने रामदास स्वामीनगर चौकात येत होता. याच वेळी ट्रकने दोघांना धडक दिल्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

तिच्या वडिलांना जयराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. ऋषिका कणकवली येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होती. दोन दिवसांसाठी सुटीमध्ये ती घरी आली होती. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुन्हा एकदा टाकळी मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी. यापूर्वीही या परिसरामध्ये अवजड वाहनांमुळे अनेक अपघात झालेले आहेत, अशी माहिती नागरिकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT