nashik municipal corporation esakal
नाशिक

नाशिक शहरातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार

विक्रांत मते

नाशिक : शहरात पारंपरिक पद्धतीने नामकरण झालेल्या रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलले जाणार असून, त्याजागी नवीन नावे दिली जाणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सहा विभागीय अधिकाऱ्यांना जातिवाचक नावे असलेली रस्ते, वस्त्‍यांची यादी सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, नवीन नावे देण्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून मे २०२१ मध्ये कायदा पारित करून राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्‍त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आयुक्त जाधव यांनी शहरातील रस्ते व वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विशेषतः गावठाण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जातिवाचक नावाच्या गल्ल्या व रस्त्यांना नावे आहेत. अनेक वर्षांपासून ही नावे असली तरी सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून नावे बदलली जाणार आहे. नगरसेवकांकडूनदेखील जात नमुद होईल, असे नामकरणाचे प्रस्ताव सादर केले जातात. त्यांनाही आता असे प्रस्ताव देता येणार नाही.

नामकरण समितीसमोर आव्हान

महापालिकेत रस्ते, गल्ली, सामाजिक सभागृह किंवा सार्वजनिक उपक्रमाला नावे देण्यासाठी नामकरण समिती गठित करण्यात आली आहे. परंतु, नामकरण समितीची बैठक होत नाही. नगरसेवकांच्या अशासकीय प्रस्तावावर आयुक्त निर्णय घेतात. आता राज्य शासनाने गल्ली, रस्त्यांची जातिवाचक नामे बदलण्याचा निर्णय घेतल्याने नवीन नावे देताना नामकरण समितीसमोर आव्हान निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Farmer Protest : अभिजीत दिपके आता शेतकरी आंदोलनात सामिल होणार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कायम सोबत असल्याचा दिला विश्वास

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

Ratnagiri Bhatye Breakwater Project : रत्नागिरीत 143 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! 'या' भागात सुरू होणार 'सी-प्लेन' सेवा; पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

Latest Marathi News Live Update : मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीका

Mumbai News: 'बाबरी' पाडली जाऊ नये म्हणणे देशद्रोह नव्हे, मुंबई पोलिसांचा तडीपारीचा आदेश रद्द; हायकोर्टाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT