crime 123.jpg 
नाशिक

सिनेस्टाईल थरार..पोलिस उपअधीक्षकांकडून दरोडोखोरांचा पाठलाग...'इतका' मुद्देमाल हस्तगत

सकाळवृत्तसेवा

नाशिक/ येवला : महामार्गावर गस्त घालत असतांना मनमाडच्या पोलिस उपअधीक्षकांना चौघे जण ट्रकचालकास तलवारीचा धाक दाखवत लुटत असल्याचे दिसले. पोलिस उपअधीक्षक यांनी आपली गाडी ट्रकजवळ नेताच दरोडेखोरांनी मोटारसायकलवर पळ काढला. याचवेळी...

येवल्याच्या दिशेने पळ

 मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे बुधवारी (ता.2) रात्री नगर- मनमाड मार्गावरील येवला तालुक्‍यात पथकासह रात्रीचा गस्त घालत असताना मनमाडकडे जात असतांना अनकाई शिवारात रस्त्याच्या कडेला (एमएच 15, बीए 8791) थांबलेला दिसला. याचवेळी ट्रकच्या कॅबीनमध्ये दोन व्यक्ती चालक व क्‍लीनर यांना तलवारीचा धाक दाखवून मारहाण करीत त्यांना लुटत असल्याचे दिसले. यावेळी पोलिस उपअधीक्षक साळवे यांनी पोलिस गाडी ट्रकजवळ नेताच पोलिसाच्या तावडीत सापडू म्हणून या दोघा दरोडेखोरांनी आपल्या आणखी दोघा साथीदारांसह दोन मोटारसायकलींवरून येवल्याच्या दिशेने पळ काढला. साळवे यांनी देखील त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी या दरोडेखोरांना धानोरे शिवारात थांबविण्याचा प्रयत्न केला असता एका दरोडेखोरास एक दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात आलाच. मात्र अंधाराचा फायदा घेत इतर तिघे जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
 पकडलेल्या दरोडेखोराकडे चौकशी करताच त्याने आपले मयूर ऊर्फ बच्चा संजय सोनवणे (रा. फत्तेबुरूज नाका, येवला) असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांने आपले इतर तिघे साथीदारा पप्पू ऊर्फ हृषीकेश शिंदे (रा. गंगादरवाजा, येवला), करण चव्हाण (रा. फत्तेबुरूज नाका, येवला), सोम्या, (रा. नागडे, ता. येवला) यांची नावे देखील सांगितली. पोलिसांनी या संशयित दरोडेखोराकडून मोटारसायकल, मोबाईल व रोकड असा 47 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ट्रकचालक राकेशकुमार गोलीचंद याच्या तक्रारीवरून येवला तालुका पोलिस ठाणे येथे चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT