Police team with arrested suspects.
Police team with arrested suspects. esakal
नाशिक

Nashik Crime : अपहरण करून लुटणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : मागील महिन्यात आडगाव पोलिस ठाणे हद्दीत मारहाण करून दोघांचे अपहरण करीत त्यांच्याकडील रोकड व सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास यश आले मिळाले आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून, अन्य चौघांचा शोध सुरु आहे. (robbery after Kidnapping gang jailed Nashik Crime News)

दत्ता सारंग कुटे (२८, रा. जेऊर, ता. मालेगाव, सध्या रा. बळी मंदिराजवळ, पंचवटी), निरंजन ऊर्फ पप्पू घेवर शेळके (३५, रा. धात्रक फाटा), आकाश राधाकिसन काळे (२४, रा. कोळपेवाडी, जि. नगर), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. जयपाल गिरासे व ओंकार राऊत हे दोघे दुचाकीवरून २७ ऑगस्टला जात होते.

त्यांना टोळक्याने अडवून बेदम मारहाण करीत दोघांनाही कारमध्ये टाकून अपहरण केले. पुन्हा मारहाण केली व दोघांकडील रोकड आणि सोन्याची चेन बळजबरीने काढले होते. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एकही करीत होते. युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू उगले, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, संदीप भांड, नाजीम पठाण, विशाल देवरे, प्रशांत मरकड आदींच्या पथकाने संशयितांचा शोध सुरू केला.

पथकाने तिघा संशयितांना साधुग्राम बसस्थानक समोरून (एमएच- १५- डीसी- १७७६) क्रमांकाच्या कारसह ताब्यात घेतले. तिघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी दरोड्याची कबुली दिली. त्यांच्यासोबत संशयित सोमनाथ कारभारी सानप, प्रशांत सखाराम आहेर, निलू ऊर्फ नीलेश कदम व आणखी एकाने दरोडा टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली (एमएच- १४- डीएफ- ६८९१) कारही जप्त केली आहे. इतर चौघांचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT