पान-२--ॲंकर
KLW26B09861भऊर (ता. देवळा) : स्वयंचलित रोबोटिक कारच्या मॉडेलसह बालवैज्ञानिक श्रीवर्धन पवार.
--------------
चालकाला डुलकी लागताच वाजणार सायरन
भऊरच्या श्रीवर्धनची कल्पकता; अपघात टाळण्यासाठी रोबोटिक कारचे मॉडेल
--------------
रवींद्र पगार ः सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता. ८ ः वाहन चालविताना चालकाला डुलकी लागल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी भऊर (ता. देवळा) येथील आठवीतील विद्यार्थी श्रीवर्धन कैलास पवार याने स्वयंचलित रोबोटिक कारचे मॉडेल विकसित केले आहे. चालकाचे डोळे सलग तीन सेकंद बंद राहिल्यास सावध करणारा इशारा आणि प्रतिसाद न मिळाल्यास वाहन सुरक्षितपणे थांबविण्याची यंत्रणा या मॉडेलमध्ये बसविल्याचे श्रीवर्धनने सांगितले.
कळवण येथील आर. के. एम. विद्यालयात शिकणाऱ्या श्रीवर्धनला लहानपणापासून यंत्रांविषयी कुतूहल आहे. वाढत्या रस्ते अपघातांवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपाय शोधण्याच्या विचारातून त्याने हा प्रयोग केला. स्वतःच्या बचतीतील पैसे आणि सहज उपलब्ध साहित्याचा वापर करून त्याने मॉडेल साकारले आहे.
वाहन चालविताना चालकाचे डोळे सलग तीन सेकंद बंद राहिल्यास मॉडेलमधील सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होते. चालकाला सावध करण्यासाठी बझर वाजतो. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास मॉडेल रस्त्याच्या कडेला जाऊन थांबते. त्याचवेळी कुटुंबीय, जवळचे रुग्णालय आणि पोलिस ठाण्याला आपत्कालीन संदेश व वाहनाचे ठिकाण पाठविण्याची सुविधाही यात असल्याचे त्याने सांगितले.
शिक्षणासोबत श्रीवर्धन शेतीकामात वडिलांना मदत करतो. ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव आणि शेतीतील यंत्रांविषयी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्याला या प्रयोगात झाला. मॉडेल तयार करण्यासाठी मित्र जयेश खैरनार याचीही मदत मिळाली.
--------------
कोट..
वाहन चालविताना डुलकी लागल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी काहीतरी करावे, या विचारातून हे मॉडेल तयार केले. भविष्यात त्यात आणखी सुधारणा करून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त यंत्रणा विकसित करण्याची इच्छा आहे.
- श्रीवर्धन कैलास पवार, विद्यार्थी
----------
श्रीवर्धनला लहानपणापासून यंत्रांविषयी कुतूहल आहे. स्वतःच्या बचतीतून साहित्य आणून त्याने हे मॉडेल तयार केले. त्याची प्रयोगशील वृत्ती आणि समाजोपयोगी संशोधनाची आवड जोपासण्यासाठी आम्ही त्याला प्रोत्साहन देत आहोत.
- कैलास पवार, पालक
------
शालेय जीवनात निरीक्षण, जिज्ञासा आणि प्रयोगशील वृत्ती जोपासणे आवश्यक आहे. श्रीवर्धनने रस्ते सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर मॉडेल तयार करून कल्पकतेची चुणूक दाखविली आहे. त्याच्या पुढील प्रयोगांसाठी विद्यालयाकडून मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाईल.
- जी. डी. रौंदळ, मुख्याध्यापक, आर. के. एम. विद्यालय, कळवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.