Saptashrungi Devi Temple esakal
नाशिक

Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगगडावरील रोपवे उद्यापासून 2 दिवस बंद

सकाळ वृत्तसेवा

Saptashrungi Devi Temple : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिरात जाण्यासाठी असलेला फ्युनिक्युलर रोपवेची सेवा १३ व १४ सप्टेंबरला वार्षिक देखभालीच्या कामासाठी बंद राहणार आहे.

भाविकांना या दिवशी पायऱ्यांनी मंदिरात दर्शनासाठी जावे लागणार आहे. (Ropeway at Saptashrungi Devi Temple closed for 2 days from tomorrow nashik)

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर देशातील पहिली फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रारंभ २ जुलै २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या हा प्रकल्प सुयोग गुरबक्साणी फ्युनिक्युलर रोपवे कंपनीच्या माध्यमातून खासगीकरणातून साकारण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येणारे अबालवृद्ध, दिव्यांग, महिला, रुग्ण भाविक, तसेच लहान मुले यांना सहजपणे आदिमायेचे दर्शन घेण्याची सशुल्क सुविधा प्राप्त झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वेळेअभावी जलद गतीने मंदिरात जाता-येता यावे, या दृष्टीनेही भाविक रोपवे मार्गाचा अवलंब करतात. दरम्यान, बुधवार (ता. १३) व गुरुवार (ता. १४) हे दोन दिवस रोपवेच्या पूर्व नियोजित तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

शुक्रवार (ता. १५) पासून रोपवेची सेवा पूर्ववत मिळणार असल्याची माहिती सुयोग गुरबक्साणी फ्युनिक्युलर रोपवेचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा यांनी दिली.

दरम्यान, रोपवे जरी दोन दिवस बंद राहणार असला तरी भाविकांना मंदिरात जाण्यासाठी पायरी मार्गावरील असलेल्या पहिली पायरी, गणपती मंदिर, महिषासुर मंदिर, श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, कासव मूर्ती आदी ठिकाणांचे दर्शन घेऊन आदिमायेचे दर्शन घेण्याचा आनंद व समाधान भाविकांना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पतीने केला पत्नीचा खून

SCROLL FOR NEXT