नाशिक

रोटरी क्लब जळगाव डिस्ट्रिक्ट मधील आदर्श क्लब - प्रांतपाल डॉ. राजेश पाटील

CD
NSK26H33645 जळगाव : रोटरी हॉलमध्‍ये आयोजित कार्यक्रमात उपस्थित प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्‍यासह रोटरीचे पदाधिकारी. – ‘रोटरी जळगाव’चा शिस्त अन् व्यवस्थापनाचा आदर्श प्रांतपाल डॉ. राजेश पाटील : गणपती नगरमधील सभागृहात कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : रोटरी संस्कृतीची योग्य जोपासना, शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन याबाबतीत संपूर्ण रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये रोटरी क्लब जळगाव हा आदर्श क्लब म्हणून नावलौकिक प्राप्त असल्‍याचे मत प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांनी व्‍यक्‍त केले. गणपती नगरमधील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लब जळगावला दिलेल्या गव्हर्नर अधिकृत भेटीप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहप्रांतपाल ॲड. सागर चित्रे, अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती. ७७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या क्लबने महिला सदस्यांची संख्या वाढवावी आणि राजोत्सव या कॉन्फरन्समध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मानद सचिव स्वाती ढाके यांनी सेक्रेटरी रिपोर्ट सादर केला. प्रांतपालांचा परिचय ॲड. सागर चित्रे यांनी करून दिला. डिस्ट्रिक्टच्या प्रथम महिला डॉ. सीमा पाटील यांचा हर्षदा भंगाळे यांनी स्वागत केले. रोटरी क्लब जळगावच्या सदस्यांनी १५ थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण मुलांना दत्तक प्रकल्प अंतर्गत केलेल्या मदतीचा धनादेश प्रांतपाल डॉ. पाटील यांच्या हस्ते रेडक्रॉसचे डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सुभाष सांखला, मंगला ठोंबरे यांना समन्वयक जितेंद्र ढाके यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. चौकट प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू रोटरी क्लब जळगाव आणि विद्यापीठाच्या विशारद स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पीस अँड हार्मनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रांतपालांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या प्रा. डॉ. मधुलिका सोनवणे, समन्वयक गिरीश कुलकर्णी व पंकज व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. ––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT