नाशिक

रोटरी सेंट्रल सदस्यांच्या खरेदीमुळे विक्रेत्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश

CD
‘रोटरी’ सदस्यांच्या खरेदीमुळे विक्रेत्यांच्या आयुष्यात आनंद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वोकल फॉर लोकल या संकल्पनेने प्रेरित होऊन रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या सदस्यांनी रविवारी (ता.१) टॉवर चौकात छोट्या पथविक्रेत्या व स्थानिक व्यावसायिकांकडून खरेदी केली. यानिमित्ताने विक्रेत्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पेरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमात क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र जैन, अध्यक्ष ॲड. केतन ढाके, प्रोजेक्ट चेअरमन कल्पेश दोशी, माजी अध्यक्ष विपुल पारेख, विष्णू भंगाळे व महेंद्र गांधी, विनय सुरतवाला, अजय चुगरा, तुषार भदाणे, यशपाल मंत्री, डॉ. सौरभ जोशी, अजितकुमार वाणी, ऋषिका ढाके यांनी स्थानिक व्यापारी व छोट्या पथविक्रेत्यांकडून ९ ते १० हजार रुपयांची खरेदी करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. या छोट्याशा खरेदीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य व त्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला; असे अध्यक्ष ॲड. केतन ढाके यांनी सांगितले. पणत्या, आकाश कंदील, रांगोळ्या, केरसुणी व पूजेसाठी आवश्यक इतर वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा व आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला हातभार लावण्याचा एक छोटासा पण अर्थपूर्ण हा प्रकल्प असल्याचे प्रोजेक्ट चेअरमन कल्पेश दोशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Court Bomb Threat: बीड जिल्हा न्यायालय उडवून देण्याची धमकी! ईमेलमुळे खळबळ, बॉम्ब शोध पथकाकडून संपूर्ण न्यायालयाची कसून तपासणी

Farmer Organizations: प्रतिटन ३८५० रुपयांचा तोडगाही अमान्य; जयसिंगपुरात बैठक; पाच हजार रुपयांवर शेतकरी संघटना ठाम, दराचा तिढा कायम!

ना दुकान, ना मोठी गुंतवणूक! दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये पाणी विकून दोन तासांत कमावले हजारो रुपये, तरुणाचा Video Viral

Who Was BB Nimbalkar? कोल्हापूरचा डॅशिंग क्रिकेटपटू! ज्याच्या नाबाद ४४३ धावांनी वादळ उठवले! 'राजा'ने सामना सोडला नसता तर ब्रॅडमनचा विश्वविक्रम मोडला असता...

मन आजही तुमची वाट पाहतंय; वडिलांच्या वर्षश्राद्धादिवशी प्रार्थना बेहेरे भावुक; कावळ्याने घास घेतल्याचा व्हिडीओ केला शेअर

SCROLL FOR NEXT