रोटरी ग्रीनसिटीतर्फे शिक्षण कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉल येथे क्रॉप (सीआरओपी) प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या यजमान पदाचा बहुमान रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीला मिळाला.
रोटरीचे ध्येय - धोरणे, नियम, कार्यपद्धती, कार्यरचना, विविध सेवा क्षेत्रे, नेतृत्व विकास, नेटवर्किंग, शिष्टाचार, सीएसआर, ग्लोबल ग्रँड यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सत्रे झाली. त्यात रोटरी फाउंडेशन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अनिरुद्ध पालदीवाल, माजी अध्यक्ष अजय नरकेसरी (नागपूर), रोटरी जळगाव गोल्डसिटीचे माजी अध्यक्ष व प्रेरणादायी वक्ते सतीश मंडोरा यांनी मार्गदर्शन केले. रोटरीच्या विविध क्लबमधील नवीन सदस्यांना रोटरीच्या कार्यप्रणालीची नेमकी दिशा मिळावी, त्यांचा सामाजिक उपक्रमातील प्रत्यक्ष सहभाग वाढावा आणि भविष्यातील सक्षम नेतृत्वाची फळी निर्माण व्हावी या उद्देशाने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकात समन्वयक व पत्रकार अभिजीत पाटील यांनी सांगितले. अध्यक्ष रत्नाकर पाटील, मानद सचिव डॉ. भावना चौधरी, समन्वयक अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यशाळेत शहरातील सर्व १३ रोटरी क्लबचे सदस्य सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.