rollet kailas shaha esakal
नाशिक

रोलेट गेम प्रकरण : गुन्ह्यातील संशयित कैलास शहा यांचा दावा

विनोद बेदरकर

नाशिक : रोलेटचे प्रकरण (roulette game) पोलीस व न्यायालयीन कक्षात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी (NCP) हे बिनबुडाचे आरोप करीत असून ते आपल्याकडे अवास्तव पैशांची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप कैलास शहा (kailas shaha) यांनी केला आहे. वकिलामार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे कैलास शहा यांनी हे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

रोलेट चालवितो हा राजकारण्याचा गैरसमज

त्यात शहा यांनी रोलेट जुगार खेळवितो म्हणून अडवणूक होत असल्याचा दावा केला आहे. नंदन भास्करे, संतोष सोनपसारे यांनी फेसबुकवर बदनामीकारक मजकूर टाकले. विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या नंदन भास्करे यांनी काही बेकायदेशीर आर्थिक मागण्या केल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ३ मार्चला माझ्या विरोधात मोक्काची कारवाई करण्याची शिफारस केली आहे. विधी मंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची दिशाभूल करून पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना आमंत्रित करून बैठक घेत मोक्का कायद्यान्वये माझ्यावर कारवाईची मागणी केली आहे. राजकीय दबावाला बळी पडून पोलिस यंत्रणा मोक्काच्या कारवाईसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते, हा प्रकार योग्य नाही.

यासंदर्भात संतोष सोनपसारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी रोलेट चालविणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून मी दीड वर्षापासून प्रयत्नशील आहे. पोलिस विभागावर माझा विश्वास असून ते चौकशी करुनच यावर कारवाई करतील. यात केवळ शहाच नव्हे तर चौरेसिया याच्यावर मोक्का लागला पाहिजे अशी मागणी केली आहे.

राजकीय व्यक्तींकडून पैशांची मागणी

रोलेट संदर्भात कैलास शहा यांची पोलिस विभागाकडून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयीन आहे. असे असताना एका पक्षाचे पदाधिकारी हे पोलिस व राजकीय नेत्यांकडून विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यापैकी एका जणावर सहा ते सात गुन्हे दाखल आहेत. त्यात शहा यांनी संबंधित राजकीय व्यक्ती पैशाची मागणी करत असल्याने हे प्रकरण आता वेगळे वळण घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT