nifad railway 1.jpg 
नाशिक

अचानक पहाटे 5.30 ला 'राज्यराणी' थांबवली!...अन्

सकाळवृत्तसेवा

नाशिक : निफाडजवळ मध्य रेल्वेचा रुळाचा तुकडा पडल्याचे निर्दशनास आल्याने सतर्कतेने अपघात टळला. गेल्या पंधरवाड्यातील ही दुसरी घटना असून रेल्वे प्रशासनापुढे आव्हान आहे. रेल्वे प्रशासनाने देखरेखीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 
 

असा आहे प्रकार

मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर उगांव ते निफाड स्टेशन दरम्यान शुक्रवारी (ता :१३) पहाटे रेल्वे रुळाचा तुकडा झाल्याचे निदर्शनास आले. तात्काळ माहिती देण्यात आल्यानंतर या मार्गावरुन धावणारी राज्यराणी एक्सप्रेस थांबविण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडुन त्वरित रुळाची दुरुस्ती देखील करण्यात आली. सद्यस्थितीत या ठिकाणाहुन संथ गतीने रेल्वे मारगावरील वाहतुक सुरु आहे. निफाड ते उगांव रेल्वे स्टेशन दरम्यान शुक्रवारी पहाटे राजाराम नामदेव घुगे, महेंद्र विष्णु कदम हे नियमित रेल्वे मार्ग तपासणी करत असतांना त्यांचे निदर्शनास  5:25 च्या सुमारास  हद्दीतील पोल क्र 219/22 ते पोल क्र 219/ 24 दरम्यान अप बाजुकडील रूळाचा तुकडा दिसला. तात्काळ याबाबत सावधगिरी बाळगत वरिष्ठांना माहिती दिली. या वेळेत मुंबईकडे जात असणारी राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वे मार्गावर थांबविण्यात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 

दरम्यान अवघ्या पंधरवाड्यात याच परिसरात रेल्वे रुळ तुटण्याची ही दुसरी घटना झाली असल्याने रेल्वे प्रशासनापुढे मार्गावरील देखरेखीचे कडवे आव्हान उभे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT