नाशिक

अश्‍वारोहण स्पर्धेत नंदुरबारची रुबी राज्यात प्रथम

CD
फोटो : NSK26H34841 नंदुरबार : राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली रूबी घोडी समवेत समर्थ राजपूत. --- अश्‍वारोहण स्पर्धेत नंदुरबारची ‘रुबी घोडी’ राज्यात प्रथम नंदुरबार, ता. ९ : कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत रूबी घोडी राज्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. नंदुरबारच्या समर्थ राजपूत याने टेंट पेगिंग खुल्या गटात ६ पेग उचलून प्रथम क्रमांक पटकावला असून, नंदुरबारचे नाव राज्यात उंचावले आहे. समर्थ हा नंदुरबार येथील एम. एन. हॉर्स रायडिंग ॲकॅडमीमध्ये गेली दोन वर्षे सातत्याने घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याने मागील वर्षी सुरत, सारंगखेडा, पुणे येथील स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळविली आहेत. या वर्षी नॅशनल सिलेक्शनमध्येही त्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशासाठी त्याला ॲकॅडमीचे ट्रेनर कृष्णा मराठे, आदित्य पवार व मोहित बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभले. कृष्णा मराठे यांच्या मेहनतीतून तयार झालेली रुबी घोडी हिचेही या यशात मोलाचे योगदान आहे. राज्यभरातून आलेल्या सर्व रायडर्सनी रुबी व समर्थचे कौतुक केले. या यशामागे डॉ. विक्रांत मोरे, ॲड. राऊबाबा मोरे यांचे सहकार्य लाभले. डॉ. विक्रांत मोरे यांनी समर्थ व कृष्णा मराठे यांच्या मेहनतीचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. स्पर्धेत परीक्षक म्हणून कर्नल सरप्रतापसिंग व महाराष्ट्र राज्य एक्वेस्ट्रिन असोसिएशनचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे यांनी रायडरचे कौतुक केले. समर्थच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT