नाशिक

भुसावळसह विभागात राष्ट्रीय एकता दिवस

CD
NSK26H34540 भुसावळ : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त काढण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी’ रॅलीत सहभागी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान. ------------------------------ भुसावळसह विभागात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. ५ : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भुसावळसह विभागात राष्ट्रीय एकता दिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘रन फॉर युनिटी’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या रॅलीचे नेतृत्व अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक व अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीना यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या रॅलीत भुसावळ विभागातील अधिकारी, कर्मचारी, रेल्वे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही रॅली विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या परिसरातून सुरू होऊन भुसावळ रेल्वेस्थानकाच्या उत्तर दिशेला येऊन तिचा समारोप झाला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ‘डीआरएम’ कार्यालयाच्या प्रांगणात अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता, अखंडता व सुरक्षेचे रक्षण करण्याची शपथ दिली. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी, रेल्वे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने देशाची एकता, अखंडता व बंधुभाव कायम राखण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. रेल्वे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकत राष्ट्रीय एकता, ऐक्य व सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT