पान तीन ॲंकर
------------
10271
नारायण टेंभी (ता. निफाड): गावात सुरू झालेले पथदीप.
गावागावात पुन्हा उजळले पथदिप
पंधरा दिवसानंतर महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. २६ : गेल्या पंधरा दिवसांपासून अंधारात बुडालेल्या ग्रामीण भागातील गावांमध्ये अखेर पुन्हा प्रकाश परतला आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलाच्या थकबाकीमुळे बंद असलेले पथदिप महावितरणाने पुन्हा सुरू केले. सरपंच सेवा महासंघाने यासाठी पाठपुरावा केला होता.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या पथदीपांसाठी यापूर्वी साधे वीजमीटर कार्यरत होते. मात्र, या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अवघ्या महिनाभरातच वीजबिलाच्या थकबाकीचा प्रश्न निर्माण झाला आणि अनेक गावांतील पथदीपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी, गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या अंधाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत होता.
ग्रामीण भागातील या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच सेवा महासंघाचे नाशिक जिल्हा संघटक देवेंद्र काजळे, नारायण टेंभी गावचे नितीन गवळी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येत अखेर महावितरणने ग्रामीण भागातील बंद पथदिप पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवार (ता.२५) सायंकाळपासून पथदिप पुन्हा सुरू झाल्याने गावागावांतील रस्ते पुन्हा प्रकाशमान झाले आहेत. दहा-पंधरा दिवसांपासून अंधारात असलेल्या गावांमध्ये पथदिप सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पथदिप बंद होऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
स्मार्ट मीटर बसविणे हा तांत्रिक विषय असू शकतो; मात्र त्याचा परिणाम म्हणून गावांतील पथदिप बंद राहणे आणि नागरिकांना अंधारात वावरावे लागणे योग्य नाही. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षेचा प्रश्न आम्ही जिल्हास्तरावर मांडून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पथदिप पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
- देवेंद्र काजळे, जिल्हा संघटक, सरपंच सेवा महासंघ, महाराष्ट्र राज्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.