Women shopping for various items on Wednesday  esakal
नाशिक

Diwali Festival 2023 : ‘लक्ष्मी पावलांनी’ बाजारपेठ सजली; विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Diwali Festival 2023 : दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे लक्ष्मी पावले, हळद- कुंकू पावले यासह विविध वस्तू बाजारात विक्रीस आल्या आहेत. महिलांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली जात आहे.

दिवाळीची खरी सुरवात वसुबारसपासून होत असली तरी दिवाळीचा मुख्य पर्व लक्ष्मीपूजन असतो. आठ दिवस विविध सण साजरे होत असतात. त्यानिमित्ताने लक्ष्मी घरात येत असते. तिचे स्वागत धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात व्हावे, अशी अनेक बांधवांची इच्छा असते. (Rush to buy things for diwali by women nashik news)

त्यानिमित्ताने पुरातन काळापासून लक्ष्मी पावले प्रवेशद्वाराच्या चौकटीवर लावली जात. आजही अशा प्रकारची प्राचीन संस्कृती देशात टिकून आहे. केवळ स्वरूप बदलले आहे. पूर्वी रांगोळीने किंवा रंगाने लक्ष्मी पावले तयार केली जात. सध्या प्लॅस्टिक, ॲक्रेलिक, लाकडी, कागदी, रेडियम तसेच रत्नांनी तयार केलेले लक्ष्मी पावले बाजारात उपलब्ध झाले आहे.

१० ते ४० रुपयांपर्यंत अशा प्रकारची पावले मिळत असल्याने नागरिकांचा कल त्यांच्या खरेदीकडे अधिक आहे. त्याचप्रमाणे शुभलाभ अक्षर, उंबरपट्टी, दारपट्टी, हळद कुंकू पावले, लटकन, तोरण, गाय- वासरू जोडी, रांगोळी स्टिकर अशा विविध वस्तू दीपावली निमित्ताने बाजारात विक्री दाखल झाले आहे. काही दिवसांवर दिवाळी आल्याने महिला वर्गाकडून या वस्तू खरेदीसाठी गर्दी केली जात आहे.

असे आहे दर

वस्तू दर

लक्ष्मी पावले १० ते ४०

शुभलाभ अक्षर १० ते ६०

दारपट्टी १० ते ४०

उंबरपट्टी १० ते ४०

हळद- कुंकू पावले ४०

लटकन ६०

तोरण ३० ते ६०

गाय वासरू जोडी ६०

रांगोळी स्टिकर २० ते ४०

"खरेदीसाठी नागरिकांचा प्रतिसाद उत्तम आहे. वस्तूंच्या दरांमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही. अॅक्रेलिक लक्ष्मी पावलांना अधिक मागणी आहे." - लक्ष्मण वाकोडे, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT