नाशिक

जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत एस. ए. मिशन हायस्कूलचे वर्चस्व

CD
फोटो : NSK26H31388 नंदुरबार : रग्बी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटविणारा एस. ए. मिशन हायस्कूलचा संघ. ----------------- जिल्हा शालेय रग्बी स्पर्धेत मिशन हायस्कूलचे वर्चस्व नंदुरबार, ता. ६ : येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला- मुलींच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत यजमान एस. ए. मिशन हायस्कूलच्या मुलांच्या संघाने तिन्ही वयोगटांत, तर १९ वर्षातील वयोगटात मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात एस. ए. मिशन हायस्कूलने आक्रमक खेळ करीत श्रॉफ हायस्कूलचा २- ० अशा फरकाने पराभव केला. १७ वर्षांखालील मुले गटात मिशन हायस्कूलच्या खेळाडूंनी शानदार रणनीती आखत श्रॉफ हायस्कूलला २- ० ने धूळ चारली. १९ वर्षांखालील मुले गटात अंतिम सामन्यात मिशन हायस्कूलच्या संघाने अँग्लो उर्दू हायस्कूलवर १-० अशी मात करत विजेतेपदावर मोहर उमटवली. विभागीय स्पर्धेसाठी निवड या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिन्ही वयोगटांत अजिंक्यपद मिळवणारे एस. ए. मिशन हायस्कूलचे विजयी संघ आता नाशिक येथे आगामी विभागीय शालेय रग्बी स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक खुशाल शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, चेअरमन मार्था अक्का सुतार आणि प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia CEO Jensen Huang : एनव्हिडियाचे सीईओ जेनसन हुआंग डिप्रेशनमध्ये? पत्नीची जाहीरपणे माफी; रोज घेतात दीड तास समुपदेशन

Marathi Short Film: व्याधीपलीकडील भावविश्वाचा शोध; सावंतवाडीतील कलाकारांच्या ‘दर्या’ लघुपटाला प्रतिसाद

एका पक्षाकडून निवडणूक जिंकली नंतर पक्षांतर... आता निवडणुकीचा खर्चही वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

Koyna Dam Project: कोयनासाठी पाच जीवांचे बलिदान; पेठवडगावातील कोरवी कुटुंबाच्या पदरी उपेक्षाच

Donald Trump New Tariffs : ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतासह १६ देश अमेरिकेच्या निशाण्यावर, व्यापार कराराला धक्का बसण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT