Local villagers came for darshan on the occasion of village deity Sati Devi-Samatdada Yatrotsava on Wednesday. esakal
नाशिक

Vadangali Yatrotsav : वडांगळीच्या यात्रोत्सवात 6 हजार बोकडांचा बळी; यात्रेची सांगता

सकाळ वृत्तसेवा

वडा़गळी (जि. नाशिक) : येथील ग्रामदैवत व बंजारा भाविकांचे कुलदैवत सतीदेवी-सामतदादा यात्रोत्सवाची बुधवारी (ता. ८) शांततेत व आनंदोत्सवात सांगता झाली. यंदा पाच दिवसांच्या यात्रोत्सवात सुमारे साडेसहा लाखांहून अधिक भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तसेच, सुमारे सहा हजार बोकडांचा बळी देऊन नवसपूर्ती केली. (Sacrifice of 6 thousand bucks in Vadangali Yatrotsav nashik news)

कोरोना महामारीनंतर झालेला हा पहिलाच यात्रोत्सव विविध अंगांनी लक्षवेधी ठरला. त्यात माघी पौर्णिमेला रविवार असल्याने झालेली भाविकांची गर्दी यात्रोत्सवाची पर्वणी ठरली. या पाच दिवसांच्या कालावधीत माघी पौर्णिमेचे दोन दिवस व शुक्रवार व मंगळवार या देवीच्या वारांच्या दिवशी भाविकांनी दर्शन घेतले.

बुधवारी सतीदेवी-सामतदादा मंदिरात व पटांगणात सतीदेवी देवस्थान ट्रस्ट व गावात भाविकांच्या राहुट्यांच्या ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. यंदा गावात यात्राकाळात वाढलेली अस्वच्छता ग्रामपंचायत प्रशासनासाठी खर्च वाढवणारी आहे.

त्यात रोगजंतूनाशक औषधे फवारणी करण्यात आली. गावातील बसस्थानक परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले. बंजारा भाविकांनी रात्रीच्या वेळी निवाऱ्यासाठी त्याचा वापर केला. भाविकांची संख्या वाढली असतानाही सतीदेवी-सामतदादा यात्रोत्सवाचा पर्यटन विकास महामंडळाच्या विकास आराखड्यातील निधी दर वर्षी मिळत नाही.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

त्यामुळे यात्रोत्सव काळात सुविधांचा अभाव जाणवतो. प्रशासनाने मंजूर आराखड्यातील निधी दिला पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वडांगळीचे सरपंच राहुल खुळे, योगेश घोटेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व सतीदेवी देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने संयोजन केले.

यात्रोत्सवात चर्चा होणार

बंजारा भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या येथील यात्रोत्सवात यंदा प्रथमच दोन मंत्री, पालकमंत्री आले होते. पालकमंत्री दादा भुसे व राज्याचे अन्न औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्याकडे निधी पाठपुराव्यासाठी प्रयत्न करावा, असे सुचविण्यात आले.

यात्राकाळातील मनोरंजनाच्या ठिकाणी ‘झुमका वाली पोरं’, ‘आला पाटलांचा बैलगाडा’ ही सातत्याने राहट पाळण्यासह ब्रेक डान्सच्या ठिकाणी वाजणाऱ्या धूनने भाविकांची गर्दी खेचली. त्यामुळे लहान मुलांसह तरुणांतही हा चर्चेचा विषय आहे. ग्रामपंचायतीची राहटपाळणे लिलाव बोलीही चर्चेत राहिली.

"वडांगळी ग्रामपंचायत दोन स्वच्छता मोहीम राबवत आहे. पुढच्या वर्षी राहाट पाळणे लिलाव करताना त्यांचे विविध प्रकारचे दर ठरवून जागा लिलाव देऊ.‌ ते सामान्याना परवडले असे असतील." -राहुल खुळे, सरपंच, वडांगळी

"यात्रोत्सवाला लाखोंच्या संख्येने भाविक आले. त्या प्रमाणात शासनाने बंजारा भाविकांना सुविधा दिल्या पाहिजे. पोहरादेवी, सेवालाल महाराजनंतर सतीदेवी-सामतदादा देवस्थान श्रद्धास्थान आहे." -अशोक चव्हाण, विश्‍वस्त, सतीदेवी देवस्थान ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT