सेकंड मेन
-----------
साधूग्रामसाठी १९१ एकर भूसंपादनाला वेग
३० शेतकऱ्यांच्या हरकती; वाटाघाटी करून प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधूग्राम उभारणीसाठी महापालिकेने १९१.२१ एकर जमिनीच्या कायमस्वरूपी संपादनाची प्रक्रिया वेगवान केली आहे. या संपादनाबाबत महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहीर नोटिशीला मुदतीत ३० शेतकऱ्यांनी हरकती व सूचना नोंदविल्या आहेत. त्यांनी जमिनीसंदर्भातील कागदपत्रेही सादर केली आहेत. आता दर निश्चितीनंतर या शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून संपादनाची पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
सिंहस्थाची पहिली पर्वणी अवघ्या दहा महिन्यांवर आली असून, यंदा आखाडे, साधू-महंत, भाविकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे तपोवनात ३३७ एकरवर साधूग्रामसह १३८० एकरवर अतिरिक्त साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. अतिरिक्त जागेच्या भाडेपट्ट्याला शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असले, तरी आरक्षित असलेल्या १९१.२१ एकरच्या संपादनाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. या संपादनासाठी ५ जून रोजी २,२६७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादन होणार असले तरी प्रशासकीय प्रक्रिया महापालिका राबवीत आहे. मात्र, निधी मंजूर होऊनही भूसंपादनाचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत, हाच मोठा अडथळा ठरला आहे. तपोवनात साधूग्रामसाठी २८०.४६ एकर आणि संलग्न सुविधांसाठी ९७.०५ एकर अशी एकूण ३७७ एकर जागा आरक्षित आहे. त्यापैकी ९४.०७ एकर महापालिकेच्या ताब्यात आली असून २८३ एकर संपादन बाकी आहे. त्यात १३ एकरात जनार्दन स्वामी मठ व लक्ष्मी गोशाळा असून १.५ एकरात अभिन्यास मंजूर आहे. त्यामुळे प्रत्यक्षात १९१ एकर जमीन संपादित केली जात आहे.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.