sadhugram
sadhugram esakal
नाशिक

Nashik News : साधुग्राम बनले ‘डेब्रिज ग्राम’! NMCतर्फे सूचन फलक लावूनही उपयोग नाही

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तपोवनातील साधुग्रामच्या जागेत ठिकठिकाणी डेब्रिज टाकण्यात आलेले आहे. या परिसरात डेब्रिज टाकण्यास मनाई असल्याचा फलक महापालिका प्रशासनाने लावला असला, तरी या फलकाजवळून डेब्रिज टाकण्यासाठी वाहने जाण्याचा मार्ग आहे.

फलकाच्या पाचशे मीटरच्या अंतरावर डेब्रिज टाकू नये, असे लिहिलेले असतानाही कुणीही या सूचनेचे पालन करीत नसल्याने साधुग्राम ‘डेब्रिज ग्राम’ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Sadhugram become debris village Even putting up notice boards by NMC no use Nashik News)

तपोवनातील साधुग्रामचा हा परिसर सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर वापराविना पडून राहात असल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, या जागेच वापर गेल्या काही वर्षांपासून डेब्रिज टाकण्यासाठी होत असल्याचे दिसत आहे.

तपोवनाच्या मुख्य मार्गापासून ते बटूक हनुमान मंदिरापर्यंतच्या भागात मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्याने या भागाकडे जाण्याच्या मार्गालगतचा भागदेखील ढिगाऱ्यांनी भरलेला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने तपोवनाच्या मुख्य मार्गालगतच्या भागात ‘तपोवन परिसरात कुठल्याही प्रकारचे माती, रॉबीट, डेब्रिज मटेरिअल टाकण्यास सक्त मनाई आहे.

टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल’ असा मजकूर असलेला सूचना फलक लावला. या परिसरातील पाचशे मीटरच्या अंतरावर असे डेब्रिज टाकू नये, असाही उल्लेख त्यात आहे. असे असतानाही परिसरात डेब्रिज टाकण्यात आलेले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कचऱ्याचाही त्रास

डेब्रिज टाकण्याबरोबरच येथे कचराही फेकण्यात येत आहे. हा कचरा थेट जाळण्याचा प्रकार घडत आहे. या कचऱ्यात प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. हा कचरा पेटवून देऊन नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

त्याची झळ येथील झाडांना बसली आहे. याच जवळच्या भागात पालापाचोळाही पेटविण्याचे प्रकार घडलेले आहेत. दाट झाडी असलेल्या भागातील अनेक झाडांच्या फांद्या तोडून नेण्याचे प्रकार येथे घडत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT