नाशिक

भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

CD
नियोजनबद्ध व्यवस्थापनातून सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य लीड सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. कुंभमेळ्यासाठी देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक, साधू-महंत आणि पर्यटक उपस्थित राहतात. या भव्य सोहळ्याचे नियोजन करताना भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता या बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. - संजय येनपुरे, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र तथा उपाध्यक्ष, कुंभमेळा प्राधिकरण --- कुंभमेळा यशस्वी, सुरक्षित आणि सुव्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी बहुआयामी नियोजन करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता, विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या चार प्रमुख आधारांवर सुरक्षित सिंहस्थाची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. पोलिस मुख्यालय, आडगाव आणि त्र्यंबकेश्वर पोलिस ठाणे येथे एकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्रे विकसित करण्याचे नियोजन आहे. या केंद्रांच्या माध्यमातून विविध ठिकाणांवरील परिस्थितीचे निरीक्षण, उपलब्ध माहितीचे विश्लेषण आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यास मदत होईल. महत्त्वाच्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्हीचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. या यंत्रणेत उपलब्ध तांत्रिक क्षमतेनुसार चेहरा ओळख प्रणाली, वाहन क्रमांक ओळख प्रणाली, वाहतूक नियमभंगाची ओळख, आग लागल्याबाबत सतर्कता आणि गर्दीतील असामान्य वाढ ओळखण्याच्या सुविधांचा समावेश करता येईल. अशा प्रणालींमधून प्राप्त होणाऱ्या सूचनांची संबंधित कर्मचाऱ्यांकडून पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. --- विशेष पथके, बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था संपूर्ण बंदोबस्तासाठी २२ हजार पोलिस अधिकारी व अंमलदारांचे मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. नियमित बंदोबस्ताबरोबरच जलद प्रतिसाद पथके, बॉम्बशोधक व नाशक पथके आणि अन्य विशेष पथकांची सज्जता सुनिश्चित केली जाईल. उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर, आवश्यक प्रशिक्षण, स्पष्ट जबाबदाऱ्यांचे निर्धारण आणि विविध शासकीय व सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय यांच्या माध्यमातून सुरक्षित आणि सुव्यवस्थित सिंहस्थ कुंभमेळा पार पाडण्यावर भर देण्यात येत आहे. सिंहस्थासारख्या मोठ्या सोहळ्यात विविध आखाडे, मठ, साधू-महंत, प्रशासकीय विभाग आणि आपत्कालीन सेवा यांच्याशी समन्वय आवश्यक असतो. यासाठी संबंधित घटकांशी समन्वय राखणाऱ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था, स्पष्ट जबाबदाऱ्यांचे निर्धारण आणि माहितीची वेळेवर देवाणघेवाण यावर भर देण्यात येत आहे. -- गर्दीचे शास्त्रीय व्यवस्थापन कुंभमेळ्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या बाबींपैकी एक म्हणजे मोठ्या संख्येने एकाच वेळी उपस्थित राहणाऱ्या भाविकांचे सुरक्षित व्यवस्थापन. विशेषतः अमृतस्नानाच्या दिवशी गर्दीच्या हालचालींचे नियोजन, विविध मार्गांवरील क्षमतेचा विचार, नियंत्रण कक्षातून परिस्थितीचे निरीक्षण आणि गरजेनुसार भाविकांच्या प्रवेशाचे नियमन अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन करताना होल्ड ॲन्ड रिलीज या पद्धतीचा आवश्यकतेनुसार वापर करून भाविकांना टप्प्याटप्प्याने पुढे सोडण्याचे नियोजन केले जाईल. त्यामुळे एखाद्या ठिकाणी अनियंत्रित गर्दी एकवटण्याची शक्यता कमी करता येईल. -- आंतरजिल्हा वाहतूक नियोजन वाहतूक नियोजन केवळ कुंभमेळा क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता नाशिककडे येणाऱ्या प्रमुख मार्गांपासूनच टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये राखीव वाहनतळ व प्रतीक्षा क्षेत्रे उपलब्ध करण्याच्या नियोजनाबरोबरच ठाणे आणि पुणे जिल्ह्यांशीही समन्वय साधण्यात येईल. या व्यवस्थेमुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या वाहनांचे नियमन, गर्दीच्या काळात वाहनांना योग्य ठिकाणी थांबविणे आणि परिस्थितीनुसार त्यांना टप्प्याटप्प्याने पुढे सोडणे शक्य होईल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी बाह्य वाहनतळ आणि अंतर्गत वाहनतळ अशी टप्प्याटप्प्याने वाहनतळ व्यवस्था नियोजित करण्यात येत आहे. बाह्य वाहनतळापासून अंतर्गत वाहनतळापर्यंत शटल बससेवा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. या सेवेमुळे वाहतूक सुलभ होण्याबरोबरच कुंभमेळा क्षेत्रात खासगी वाहनांची अनावश्यक गर्दी कमी होईल. -- घाट परिसराच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष कुशावर्त तीर्थ आणि इतर स्नानघाटांवर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष नियोजन करण्यात येत आहे. गर्दीचे नियमन, प्रवेश आणि निर्गमन मार्गांची व्यवस्था, घसरड्या पृष्ठभागामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत उपलब्ध होणे या बाबींना प्राधान्य दिले जाईल. प्रशिक्षित जलतरणपटू आणि जीवरक्षक उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यांच्याबरोबर आवश्यक बचाव साहित्य, संपर्क व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसादाची सुसज्ज यंत्रणा उपलब्ध आहे. वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि पोलिस यांच्यातील समन्वय प्रभावी ठेवण्यावर भर देण्यात येतो. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे परीक्षण, आवश्यक अग्निशमन साधनांची उपलब्धता आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक तपासण्या करण्यात येणार आहेत. याबरोबरच पोलिसांच्या निवास, विश्रांती, पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजनही महत्त्वाचे आहे. दीर्घकाळ बंदोबस्तावर कार्यरत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि सज्जता टिकवून ठेवण्यासाठी या बाबींकडे लक्ष दिले जात आहे. --- समन्वय, प्रशिक्षण अन्‌ वेळेत अंमलबजावणी अधिकारी व अंमलदारांना गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद, तंत्रज्ञानाचा वापर आणि भाविकांशी संवाद या बाबींमध्ये आवश्यक प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. तंत्रज्ञानामुळे परिस्थितीचे निरीक्षण आणि माहितीचे विश्लेषण अधिक प्रभावी होऊ शकते; मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी तत्परतेने कार्य करणारे प्रशिक्षित पोलिस मनुष्यबळ, स्पष्ट जबाबदाऱ्या आणि प्रभावी समन्वय हेच सुरक्षिततेचे मुख्य आधार असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

SCROLL FOR NEXT