पान तीन
-----------------
27545
येवला : श्री सहस्रार्जुन भगवान जयंतीनिमित्त पालखी मिरवणुकीत सहभागी महिला.
येवल्यात श्री सहस्रार्जुन
भगवान जयंतीनिमित्त पालखी मिरवणुक
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१७ : शहरातील खत्री गल्ली परिसरात श्री सहस्रार्जुन भगवान जयंती भक्ती, उत्साह आणि पारंपरिक धार्मिक वातावरणात साजरी झाली.यानिमित्ताने पालखी मिरवणुक, धार्मिक कार्यक्रम व भव्य महाप्रसाद असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज आणि श्री सहस्रार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने बालेश्वरी माता मंदिरात आयोजित जयंती सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी मिरवणूक काढण्यात आली. समाजबांधवांच्या मोठ्या सहभागाने आणि जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. येथील जोगवाड्यात बालेश्वरी माता मंदिरात आयोजित या सोहळ्याची सुरुवात सकाळी सातला बालेश्वरी मातेला पैठणी साडी अर्पण करण्याच्या धार्मिक विधीने झाली. यानंतर सायंकाळी श्री सहस्रार्जुन भगवान जयंतीनिमित्त पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीत समाजातील महिला, पुरुष आणि युवकांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी श्री सहस्रार्जुन भगवान यांची विधिवत महाआरती करण्यात आली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाकळे, उपाध्यक्ष पांडुरंग भांडगे, श्रीकांत बाकळे, सचिव जयप्रकाश कोकणे, खजिनदार सुमित भांडगे, सहखजिनदार शेखर खेरुड, मार्गदर्शक प्रवीण पहिलवान, विनोद बाकळे, ज्ञानेश्वर सांबर आदींनी नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.