फोटो- दोन कॊलम, बातमी दोन कॉलम
फोटो-22971
देशवंडी ः ग्रामलोक कार्यक्रमात बोलताना साहित्य अकादमीचे डॉ. नरेंद्र पाठक. शेजारी डॉ. अरुण ठोके, समाधान गायकवाड, किरण भावसार, रवींद्र कांगणे, राजाराम मुंगसे आदी.
साहित्य अकादमीचे काम
वस्त्यांपर्यंत पोहोचवावे ः डॉ. पाठक
सिन्नर, ता. ११ ः वाड्या वस्त्यांपर्यंत साहित्य अकादमीचे उपक्रम, योजना पोहोचल्या पाहिजेत. तळागाळातील साहित्यिक, लोकवाङ्मय, ग्रामीण बोलीभाषा, अस्तंगत होत चाललेले शब्द साहित्य व्यवहारात रूढ व्हायला हवे. त्यामुळे ग्रामालोक कार्यक्रमातून साहित्य अकादमी खेड्यापाड्यातील साहित्यिक व रसिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे प्रतिपादन साहित्य अकादमीचे केंद्रीय कार्यकारी मंडळ सदस्य प्राचार्य डॉ. नरेंद्र पाठक यांनी केले.
देशवंडी येथे झालेल्या ग्रामालोक कार्यक्रमात ते बोलत होते. साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव डॉ. अरुण ठोके, संस्थेचे संचालक समाधान गायकवाड प्रमुख पाहुणे होते. किरण भावसार, रवींद्र कांगणे, सोमनाथ एखंडे, अमोल चिने, राजाराम मुंगसे यांनी कविता सादर केल्या. वामनदादा कर्डक यांच्या गीताने कविसंमेलनाची सुरुवात झाली.
विष्णू वाघ, सुनीता सांगळे, बाबासाहेब भोरकडे, डॉ. राजेंद्र कमानकर, डॉ. दीपक श्रीमाळी, सुनीता वाळुंज, ज्ञानेश्वरी तासकर, नागेश सोंडकर, धनश्री पानसरे, जयश्री चव्हाणके, श्रावणी सांगळे, अर्जुन डोमोडे आदींनी कविता सादर केल्या.
सचिन कांगणे, ॲड. गोपाळ बर्के, प्राचार्य रवींद्र गोरडे, वसंत पाटील, प्रवीण बोडके, रमेश डोमाडे, यादव कापडी आदी उपस्थित होते. अमोल चिने यांनी सूत्रसंचालन केले. अर्जुन डोमाडे यांनी आभार मानले.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.