Jaishree Thorat, daughter of former Minister Balasaheb Thorat, welcoming Sant Nivrutinath Maharaj Palkhi ceremony at Paregaon in Ahmednagar district.
Jaishree Thorat, daughter of former Minister Balasaheb Thorat, welcoming Sant Nivrutinath Maharaj Palkhi ceremony at Paregaon in Ahmednagar district. esakal
नाशिक

Wari 2023: वैष्णवांचा मेळा नगर जिल्ह्यात दाखल! संत निवृत्तीनाथ पालखीचे नाशिकच्या सरहद्दीवर पारेगावात स्वागत

अजित देसाई

Wari 2023 : वैष्णवांचा मेळा घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतोष श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळा नाशिक जिल्ह्याची सरहद्द ओलांडून अहमदनगर जिल्ह्यात पोहोचला.

संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथे आशापीर देवस्थानच्या परिसरात अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. (Saint Nivrittinath Palkhi ashadhi Wari 2023 Enters Nagar District at Paregaon on border of Nashik news)

अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करता क्षणी वरूणराजाने देखील बरसत पालखीला अभिवादन केले. यावेळी पालखी सोबत असणाऱ्या हजारो वारकऱ्यांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

सिन्नर तालुक्यातील दातली येथे बुधवारी गोल रिंगण सोहळा आटोपल्यावर पालखीचा मुक्काम खंबाळे येथे होता. गुरुवारी सकाळी सात वाजता पालखीने प्रस्थान केले. सुरेगाव येथून पुढे आल्यावर मऱ्हळ ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती.

हा पाहुणचार स्वीकारल्यानंतर निऱ्हळे गावात देखील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या दोनही गावांमध्ये वारकऱ्यांना घरोघर जेवणाचा आग्रह करण्यात आला. निऱ्हळे येथील श्री बुवाजी बाबा देवस्थानचे स्वागत स्वीकारून पालखी आशापिर गडाच्या दिशेने रवाना झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ठिकाणी जिल्हा सरहद्दीवर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम शालीमठ, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे, पारेगावच्या सरपंच संध्या गडाख, एड. त्रंबक गडाख, डॉ. दत्तात्रय गडाख, एल.के. पाटील आदींनी पालखी पूजन करून स्वागत केले.

नाशिक जिल्ह्यातील शेवटच्या टप्प्यात वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांनी प्रशासनाच्या पालखी तसेच सोबतच्या हजारो वारकऱ्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या व वारकऱ्यांच्या पुढच्या प्रवासाची जबाबदारी अहमदनगर पोलिसांकडे सोपवली.

गडाच्या पायथ्याशी पारेगाव येथील देव वाट भागातील ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी हजारो भाविकांनी मसालेभात, बुंदी व हुसळ या महाप्रसादाचा लाभ घेतला. पालखीचा मुक्काम पारेगाव येथे राहिला. यावेळी वारकऱ्यांसाठी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांनी घरोघर केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT