An evergreen guava garden as an intercrop planted in a bamboo field by Haribhau Sonwane. esakal
नाशिक

SAKAL Exclusive: बांबूच्या शेतातील पेरूची आंतरपीक बाग! राज्यातील पहिला सेंद्रिय शेतीचा येवल्यात प्रयोग यशस्वी

- प्रशांत कोतकर

नाशिक : सतत तोट्यात जाणाऱ्या पारंपरिक शेतीला फाटा देऊन नव्या तंत्रज्ञानाची कास धरून आधुनिक शेती फायद्यात राहते, हे वास्तव नव्या पिढीने जाणले. नव्या कृषी क्रांतीची बीजे पेरण्यास सुरवात केली.

त्याच पिढीचे वारस असलेले हरिभाऊ सोनवणे या तरुणाने आपल्या वडिलोपार्जित शेतीत एक प्रयोग केला आणि अवघ्या आठ महिन्यांत यशस्वी करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक वेगळी वाट निर्माण करून दिली.

त्यांनी बांबूच्या शेतीत आंतरपीक म्हणून पेरूची बाग निर्माण केली आहे. शेतीसाठी वेळेवर शेतमजुरांचा प्रश्न होताच, मात्र स्वतः शेतीत राबून मोठ्या कष्टाने त्यांनी बांबूच्या शेतीत सदाबहार पेरू हा राज्यात पहिला प्रयोग यशस्वी केला असल्याचे हरिभाऊ सांगतात. (SAKAL Exclusive Guava intercropping garden in bamboo farm first organic farming experiment in state successful nashik)

हरिभाऊ यांनी या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडे असलेल्या पावणेसात एकरपैकी चार एकर बांबू लागवड केली. यापैकी बांबूच्या शेतीत ३६ गुंठ्यांत सदाबहार पेरू लागवड केली आहे.

इथे मियावाकी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी आणि अल्ट्रा हायडेन्सिटी या पद्धतीने लागवड केलेली आहे. ३६ गुंठ्यात सदाबहार पेरूंच्या दोन हजार रोपांची लागवड करून कमी क्षेत्रात जास्त झाडांचे रोपण करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यावर त्यांचा भर आहे.

या ३६ गुंठ्यांतील शुद्ध सेंद्रीय नारळ, बांबू, सदाबहार पेरू, सिडलेस लिंबू, काजू, हिरडा, बेहडा, आवळा, शेवगा, गवार, डांगर, भोपळा, मेथी, कोथिंबीर, घेवडा, अंजीर, केशर आंबा, आवाकोडो, ड्रॅगन फ्रूट, सफेद जांभूळ, फणस, मोहगनी, चंदन ही सर्वच अशी विविध मिश्र फळझाडे लावली आहेत.

या प्रयोगामुळे शेतीची सेंद्रिय पोत सुधारणार आहे. यासाठी जीवामृत तयार करणारा सहा हजार लिटर क्षमतेचा हायटेक एन एरेबेटीक फुगा बसविला आहे.

शुद्ध गावरान भाजीपाल्यासाठी बिजमाता राहिबाई पोपरे यांच्याकडून विविध प्रकारचे गावठी बियाणे आणून शेतात लावले आहे. त्यांची शेती अनेकांना आकर्षित करीत आहे. यापैकी शेवगा, अंजीर, सिडलेस लिंबू, गवार, डांगर यांना फळंही आली आहेत.

सेंद्रिय पोत सुधारण्यासाठी पेरूला दोन ट्रॉल्या गीर गायीचे शेणखत भरले. त्यावर आठवड्यातून एकदा जीवामृत देण्यात येत आहे. झाडांचा मजबूत विकास व्हावा म्हणून १०० टक्के जैविक खते देऊन फळेही चांगल्या प्रतीचे तयार होत आहेत.

पहिल्याच खुड्यात २०० ते ५०० ग्रॅमपर्यंत फळ मिळत आहे. सध्या २० ते ३० किलो माल मिळत असून, लवकरच क्विंटलमध्ये माल तयार होईल. पेरू लिंबाच्या आकाराचे होताच फोम आणि पिशवी टाकण्यात येत असल्याने पेरू कुठल्याच आजाराला बळी पडत नाही.

जीवामृत जैविक खते यामुळे पेरू अत्यंत निरोगी असून, शुगर फ्री असल्याने मधुमेह झालेले रुग्ण याला विशेष पसंती देत आहेत. हा पेरू सध्या १०० रुपये किलो दराने हातोहात विक्री होत आहे.

असा केला प्रयोग

हरिभाऊ सोनवणे यांनी सातपैकी चार एकर क्षेत्रात १५ × १५ फूट अंतरावर ७०० बांबूच्या रोपांची लागवड केली आहे. एक एकरमध्ये बांबूच्या दोन झाडांमध्ये प्रत्येक दोन फुटांवर थाई सदाबहार पेरूची लागवड केली.

दोन सरीत तीन फूट अंतरावर पुन्हा सदाबहार पेरू लागवड केली. पहिल्या सात महिन्यांतच पेरूच्या फळांनी झाड लगडून गेले. विशेष म्हणजे हे संपूर्ण क्षेत्र १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने विकसित केले असल्याने बांबूचे जंगल बहरले अन्‌ पेरूही अवीट गोडी देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT