Migration esakal
नाशिक

SAKAL Exclusive: दिवाळीपूर्वीच मजुरांचे शहराकडे स्थलांतर! रोजगार हमी योजनेवर मिळेना काम

भाऊसाहेब गोसावी

चांदवड : तालुक्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची टंचाई तीव्र झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊसच पडला नसल्याने पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही अन् स्थिती आहे.

यामुळे दिवाळी सणापूर्वीच कामाच्या शोधासाठी आदिवासी बांधव, मजूर हे आपले गाव सोडून शहराकडे स्थलांतरित झाले आहे. (SAKAL Exclusive Migration of laborers to city before Diwali Not getting work on employment guarantee scheme nashik)

चांदवड तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या हाती कुठलेच पीक लागले नाही. त्यामुळे तालुक्यातील पाझर तलाव कोरडेठाक पडले आहे. यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे ऐन दिवाळी सणापूर्वीला हाताला काम मिळावे म्हणून तालुक्यातील शेकडो मजुर शहराकडे स्थलांतरित झाले आहे. यंदा कायम दुष्काळी पट्ट्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला.

त्याचा मोठा परिणाम खरीप पिकावर झाला. खरीप पूर्ण वाया गेला आहे. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने तर शेतकऱ्यांसह मजुरांचे तोंडचे पाणीच पळाले.

शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर झाला आहे. उन्हाळ्यात तालुक्यातील टंचाईग्रस्त गावात सुरु केलेले टँकर अजूनही सुरुच आहे.

दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे तालुक्यातून अनेक मजुरांनी रोजगाराच्या शोधात शहराकडे, ऊसतोडणीसाठी तसेच वीटभट्टीसाठी स्थलांतर केले आहे.तर शेकडो मजूर दिवाळीनंतर स्थलांतर करणार आहेत .

रोजगार हमी योजना दुष्काळाच्या कचाट्यात

ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर थांबावे म्हणून सुरु करण्यात आलेले रोजगार हमी योजना तालुक्यात दुष्काळाच्या कचाट्यात सापडली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत मोचकेच कामगार काम करीत आहे.

"माझ्याकडे दहा, बारा शेळ्या होत्या. इथे पाणी, चारा नसल्याने मी शेळ्या मुलीकडे पाठविल्या. आम्हालाही इथे काम नसल्याने कामासाठी स्थलांतर करणार आहे. आता मिळेल ते काम करून दिवस काढावे लागतील."- छबू पिंपळे, आदिवासी शेतमजूर, निमोण (ता. चांदवड)

"रोजगार हमीची कामे मागणी केल्यास तत्काळ उपलब्ध करून देण्यात येतील."

- मंदार कुलकर्णी, तहसीलदार चांदवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT