performing arts teacher esakal
नाशिक

SAKAL Exclusive: तांत्रिक शिक्षणातून संधी मिळाव्यात; परफॉर्मिंग आर्ट शिक्षकांना आशा

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Exclusive : शैक्षणिक धोरणात कला क्षेत्राला दुय्यम स्थान मिळत आले आहे. नाशिकमध्ये दोनशेवर संगीत शिक्षक असून तितकेच नृत्य, नाट्य क्षेत्रातही कार्यरत आहे. परफॉर्मिंग आर्टला ठोस धोरण नसल्याने शिक्षक हतबल झाल्याची भावना आहे.

प्रत्येक शाळा, महाविद्यालयात परफॉर्मिंग आर्टचे औपचारिक शिक्षण मिळाल्यास शिक्षकांना संधी निर्माण होऊन विद्यार्थ्यांनाही तांत्रिक शिक्षणातून करिअरचे विविध संधी मिळतील अशी आशा परफॉर्मिंग आर्ट शिक्षकांना आहे. (SAKAL Exclusive Opportunities through technical education Hope for performing arts teachers nashik)

संगीत शिक्षकांना संच मान्यतेत स्थान नसल्याने मराठी माध्यमांमध्ये चित्रकला शिक्षकच विद्यार्थ्यांना संगीत, नाट्य, नृत्य शिकवतात, त्यामुळे कला शिक्षकांसमोर मोठे आव्हान आहे.

परफॉर्मिंग आर्टचा शिक्षक विद्यार्थ्यांसमोर आयकॉन ठरावा मात्र, योग्यता, पात्रता सिद्ध न करता संगीत शिक्षक विद्यार्थ्यांना धडे देत आहे. संचमान्यतेत टिकून राहण्यासाठी चित्रकला संघटनांनी पाठपुरावा केला.

परंतु परफॉर्मिंग आर्टचे शिक्षक त्यात मागे पडले. नाशिकमधील शैक्षणिक संस्था परफॉर्मिंग आर्टचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

परंतु धोरणांपुढे संस्था हतबल ठरताना दिसत आहे. परफॉर्मिंग आर्टचे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांची नगण्य आहे, त्यामुळे पाल्याला पूर्ण शिक्षण घेऊ देण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"परफॉर्मिंग आर्टच्या शिक्षकांचा संचमान्यतेतच समावेश नाही, कला शिक्षकांसमोर मोठे आव्हान आहे. शाळा तिथे संगीत अशी संकल्पना राबविल्यास संगीत शिक्षकांना संधी मिळू शकतील. संगीतक्षेत्रात कराओके सारख्या घातक तंत्रज्ञान आले आहे. त्यातून मुलांना शुद्ध शिक्षण मिळत नाही." - आनंद अत्रे, संगीत विभागप्रमुख, मविप्र स्वरब्रह्म संगीत निकेतन

"परफॉर्मिंग आर्टमध्ये अनेक संधी असताना विद्यार्थ्यांची संख्या कमी असणे ही मोठी अडचण आहे. विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवल्यास अनेक संधी उपलब्ध आहेत. परफॉर्मिंग आर्टमध्ये स्पर्धा वाढली आहे."- प्रा. प्रवीण जाधव, नाट्य विभाग, हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग ऑफ आर्ट

"शैक्षणिक धोरणात परफॉर्मिंग ऑफ आर्ट अनिवार्य नसल्याने विद्यार्थी या क्षेत्राकडे वळत नाही. यातील अनेक संधीतून पुढे जाण्याचे मार्ग आहेत. मात्र सोशल माध्यमाद्वारे विद्यार्थी कला जोपासत असल्याने ठराविक वर्ग या क्षेत्राकडे येतो. विद्यार्थ्यांना लहानपणापासून परफॉर्मिंग ऑफ आर्टचे धडे मिळाल्यास या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल."

संतोष अहिरे, नृत्य विभाग, हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग ऑफ आर्ट

"परफॉर्मिंग आर्ट्समध्ये रंगमंचावरील सादरीकरणाच्या कला असल्याने कलांचे शिक्षक /रंगमंचीय कलाकार असणे आवश्यक आहे. असे कलाकार मिळणे सध्याच्या काळात अवघड आहे. विद्यार्थ्याने किमान बारा वर्ष तालीम घेणे आणि डोळस रियाझ करणे महत्त्वाचे असते. आजच्या धावपळीच्या युगात इतका वेळ देणे विद्यार्थ्यांनाही शक्य नाही. तालीम, रियाझ, चिकाटी, संयमाचा अवलंब केला तर यश निश्चित आहे."- सुजित काळे, तबलावादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT