UDISE +  esakal
नाशिक

SAKAL Exclusive: यू-डायस प्लसकडे शाळांची पाठ! राज्यातील 38 हजारांहून अधिक शाळांचा समावेश

प्रशांत बैरागी

नामपूर : देशातील शैक्षणिक धोरणात एकसूत्रीपणा आणण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे ‘यू-डायस प्लस' संकेतस्थळाद्वारे शाळेच्या सर्व माहितीचे संकलन केले जाते.

परंतु वारंवार मुदतवाढ देवूनही राज्यातील ३८ हजाराहून शाळांनी ऑनलाइन माहिती भरण्याकडे पाठ फिरवली आहे. या शाळांनी ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती सादर करावी, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. (SAKAL Exclusive Schools turn to UDISE Plus Including more than 38 thousand schools in state nashik)

भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी देशातील सर्व शाळांची माहिती ऑनलाइन पद्धतीने संगणकीकृत करण्यासाठी ‘यू-डायस प्लस' प्रणाली विकसित केली आहे.

‘यू-डायस प्लस' प्रणालीमध्ये संकलित माहितीनुसार समग्र शिक्षा, मध्यान्ह्य भोजन, शिष्यवृत्ती आदी योजनांसाठी निधी मंजूर करण्यात येतो.

‘यू-डायस प्लस' प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र सरकार समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक, नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वे, स्कूल एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन इंडेक्स निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजन केले जाते.

राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांची माहिती ‘यू-डायस प्लस' प्रणालीमध्ये टप्प्याटप्प्याने भरली जाते.

दरवर्षी शैक्षणिक योजनांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. निर्धारित वेळेत अचूक ‘डेटा' हा योग्य आणि प्रभावी नियोजन आणि निर्णय घेण्याचा आधार आहे. चांगल्या प्रकारे कार्यरत शाश्‍वत शैक्षणिक व्यवस्थापन माहिती प्रणालीची स्थापना महत्त्वाची आहे.

युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस ही शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय यांनी सुरू केलेल्या सर्वांत मोठ्या व्यवस्थापन माहिती प्रणालींपैकी एक आहे. त्यामुळे शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रकांसाठी ‘यू-डायस’वरील माहिती विचारात घेतली जाते.

शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधांसह, शिक्षक, विद्यार्थी संख्या, विविध शिष्यवृत्ती योजना आदी माहितीची स्थिती यू-डायस संकेतस्थळावर भरणे बंधनकारक आहे.

परंतु यू-डायस संकेतस्थळावर माहिती न भरल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून खडे बोल सुनावले जात आहेत.

आकडे बोलतात

० देशातील शाळा : १४ लाख ८९ हजार

० सरकारी शाळा : १० लाख २२ हजार

० एकूण शिक्षक : ९५ लाख

० एकूण विद्यार्थी : २६ कोटी ५२ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT