Newly installed beds in Ambad cemetery esakal
नाशिक

SAKAL Impact: अंबडच्या स्मशानभूमीला मिळाले नवीन बेड! ग्रामस्थांनी मानले आभार

सकाळ वृत्तसेवा

सिडको : गेल्या वर्षभरापासून नाशिक शहरातील महापालिकेवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे नागरिकांना जिवंतपणीच अनेक समस्या सहन कराव्या लागत असताना मरणानंतरही मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचे विदारक चित्र ‘याची देही याची डोळा’ अंबड स्मशानभूमीत बघायला मिळत होते.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मनपा प्रशासकीय राजवटीबद्दल तीव्र संताप व्यक्त होताना दिसत होता. याबाबत ‘सकाळ’ च्या माध्यमातून वाचा फोडण्यात आली. त्यानंतर लगेचच मनपाने याची दखल घेत नवीन बेड उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार व्यक्त केले आहे. (SAKAL Impact Ambad cemetery got new bed villagers happy nashik)

अंबड गावांमध्ये अचानक दोन दोन ग्रामस्थांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी १७ नोव्हेंबरला अंबड गावाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे ठरले. एकाच दिवशी दोन जणांचे मृतदेह आणण्याची वेळ आली.

मात्र एक बेड सुस्थितीत, तर दुसरे बेड मात्र पूर्णपणे नादुरुस्त असल्याचे विचित्र चित्र आलेल्या नातेवाईक व मित्र परिवाराला बघायला मिळाले. त्यामुळे दोन्हीकडचे मंडळी धर्म संकटात पडले. अशा वेळी सामंजस्याने एकच अंत्यविधी उरकण्यात आला.

तर दुसऱ्या अंत्यविधीसाठी लागणारा दुसरा नादुरुस्त बेड स्वखर्चाने दुरुस्त करण्यात आला. यासंदर्भात वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

महापालिका प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन तेथे नवीन बेड या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने अंबड ग्रामस्थांनी सकाळचे आभार मानले आहे.

"सप्टेंबर २०२२ मध्ये मनपा शहर अभियंत्यांना यासंदर्भात निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी दोन्हीही बेड दुरुस्त करून देण्याचे आश्वासन शहर अभियंत्यांनी दिले होते. त्यानंतर दोन बेडपैकी एक बेड दुसऱ्याच दिवशी दुरुस्त करून देण्यात आला. परंतु एक वर्ष उलटूनही मनपाला दुसरा बेड दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळाला नाही. या संदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच येथे नवीन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ‘सकाळ’चे आभार."- शरद दातीर, शाखाप्रमुख, शिवसेना, अंबड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहोत आणि महाराष्ट्र सरकारही यासंदर्भात चर्चा करतंय - सुळे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT