The report published in 'Sakal' about the condition of the empty road. esakal
नाशिक

SAKAL Impact: नळकस रस्त्याचे भाग्य उजळणार! प्रधानमंत्री ग्रामसडकमधून अडीच कोटींचा निधी उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या नळकस रस्त्याच्या डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण कामासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

त्यामुळे दिल्याने नळकस रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. नळकस रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सकाळमध्ये नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते.

सदर रस्त्याचे भूमिपूजन गुरुवारी (ता.३०) सकाळी अकरा वाजता होणार असल्याने नववसाहतीतील नागरिकांनी सकाळला धन्यवाद दिले आहेत. (SAKAL Impact fate of empty road will brighten Fund of two half crores available from Pradhan Mantri Gramsadak nashik)

नामपूर शहरातून जाणारा नळकस रस्ता ग्रामीण मार्ग क्रमांक ९ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपूर्वी सुमारे साडेतीन किलोमीटर नळकस रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे.

परंतु शहरात सटाणा बाजार समितीच्या माध्यमातून कांदा खरेदी मार्केट सुरू झाल्यानंतर रस्त्याची दुरावस्था होण्यास सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून नळकस रस्त्यालगत कांदा मार्केट सुरू झाल्याने रस्त्यावर कांद्याने भरलेले ट्रॅक्टर्समुळे वाहतूकीची कोंडी होत आहे.

नळकस रस्त्यालगत अनेक नववसाहती असून सहकारी सोसायटी, कांदा खरेदी मार्केट, व्यापारी संकुल, वीज वितरण कंपनीचे कार्यालय, पेट्रोल पंप असल्याने रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते.

नागरिकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने रस्त्यावरील प्रवास जीवघेणा बनला आहे. परिसरातून पावसाचे पाणी जमा होते.

परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने रस्त्यालगत पाण्याचे तळे तयार होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नववसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यालगत सर्वत्र प्रचंड धुळीचे साम्राज्य असल्याने नववसाहतीमधील रहिवाश्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागावे, यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, नववसाहतीमधील नागरिक आदींचा आमदारांसह प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता.

गेल्या वर्षी यतींद्र पाटील यांच्या प्रयत्नातून एक कोटी रुपये खर्चून पेट्रोल पंपापासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत सुमारे ३०० मीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाले आहे. परंतु त्यापुढील रस्त्यावर प्रवास करताना मरण यातना भोगाव्या लागत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत.

उर्वरीत रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वी नामपूर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब अहिरे यांनी पदभार स्वीकारताच रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files : रशियन पासून अफ्रिकन पर्यंत अशा निवडल्या जायच्या मुली, कसा ठरवला जायचा रेट? जगाला हादरवणारे High Profile Sex Scandal

Indian Railway Ticket : रेल्वे तिकीटावरील GNWL, RLWL, PQWL म्हणजे काय? RAC तिकीट कन्फर्म असतं का? प्रवासापूर्वी नक्की जाणून घ्या!

Latest Marathi News Live Update : माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीबद्दल लिलावती रुग्णालयाची चार वाजता पत्रकार परिषद

VIDEO : आईचा हात धरुन तलवार हातात घेत दिव्यांग मुलगा स्टेजवर चढला…; शिवरायांच्या वेशातील 'हा' व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Eating Bread Daily: दररोज ब्रेड खाल्लं तर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

SCROLL FOR NEXT