Ongoing repair of ghat at Mhaiswalan esakal
नाशिक

SAKAL Impact : म्हैसवळण घाटाच्या दुरुस्तीला अखेर सुरवात! आमदार कोकाटेंकडून अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक- नगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वपूर्ण टाकेद-म्हैसवळण घाटमार्गे अकोले तालुक्यात जाणाऱ्या घाट रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली होती.

सप्टेंबर २०२२ मध्ये या म्हैसवळण घाट भागात जोरदार अतिवृष्टी होऊन घाटात अनेक ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्या होत्या. अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला तसेच पूर्णपणे खचला होता. हा रस्ता टाकेद गावापासून ते संपूर्ण घाट रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला होता.

याबाबत सकाळने 'म्हैसवळण घाट बनला मृत्यूचा सापळा' या वृत्ताद्वारे लक्ष वेधले होते. तिची आमदार माणिकराव कोकाटे यांनी तातडीने दखल घेत संबंधित विभागाला सूचना करून रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे. परिसरातील नागरिकांकडून ‘सकाळ’चे कौतुक होत आहे. (SAKAL Impact repair of Mhaisvalan Ghat finally started Instructions to officials from MLA Kokate nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या रस्त्यावरून अकोले तालुक्यातील एकदरा, खिरविरे, कोंभाळणे, कोकणवाडी, जायनावाडी, तिरडे, पाचपट्टा, केळी, सांगवी, ठाणगावसह अनेक गावांमधून वाहनधारक प्रवासी, शेतकरी वर्ग इगतपुरी तालुक्यातील टाकेद-घोटी या ठिकाणी बाजारपेठ मार्केटमध्ये रोज येत असतात.

रस्त्याच्या दुरुस्तीमुळे या परिसरातील नागरिकांचा त्रास कमी होणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. रस्त्यासाठी रुंदीकरण व काँक्रिटच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.

"म्हैसवळण घाटाची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या स्थितीबाबत ‘सकाळ’ ने आवाज उठविला. आमदार माणिकराव कोकाटे यांनीही दखल घेतली, त्यामुळे आमची समस्या सुटणार आहे." - एक नागरिक, टाकेद बु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT