civil hospital
civil hospital esakal
नाशिक

SAKAL Impact : ‘त्या’ प्रकरणी डीनकडे मागितला अहवाल; जिल्हा शल्यचिकित्सकांकडून गंभीर दखल

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : जिल्हा रुग्णालयामध्ये जळीत वार्डातील जिवंत रुग्णाला प्रशिक्षणार्थी डॉक्टरने मयत घोषित करण्यात आल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी (ता.२५) उघडकीस आला होता.

या प्रकरणी ‘सकाळ’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात काही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने त्याची जिल्हा शल्यचिकित्सकांनी गंभीर दखल घेत सदरील वॉर्डची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनकडे याबाबत सविस्तर अहवाल मागविला आहे.

तसेच सदरील प्रकाराची माहिती आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनाही कळविली आहे. (SAKAL Impact Report sought from Dean in that case Serious attention from District Surgeon Nashik News)

सकाळची बातमी

अशोक स्तंभ परिसरात राहणारे नितीन मोरे यांनी सोमवारी स्वतःला पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले होते. यात ते ९३ टक्के भाजल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील जळीत वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.

दरम्यान गुरुवारी (ता.२५) सकाळी साडेसहावाजता या वॉर्डातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरने ईसीजी रिपोर्ट काढून मोरे यांना मयत घोषित केले. त्यानंतर नातलगांनी पुढची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान सकाळी आठच्या सुमारास रुग्ण मोरे हे जिवंत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले.

त्यामुळे या प्रकरणांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरने रुग्ण मयत घोषित करण्यापूर्वी वॉर्डातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कल्पना न देता परस्पर रुग्ण मयत घोषित केले. सदरची बाब निष्काळजीपणा व अतिघाईची असल्याने यातून अनेक प्रश्न ‘सकाळ’च्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचीच दखल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी शुक्रवारी घेत वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांना याबाबत सविस्तर अहवाल तत्काळ देण्याचे सूचित केले. तसेच या प्रकरणाची सविस्तर माहिती आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनाही कळविली.

"रुग्ण मयत घोषित करण्यापूर्वी अनेक प्रकारे तपासणी केली जाते, केवळ ईसीजी रिपोर्ट फ्लॅट आला म्हणून रुग्ण मयत घोषित करता येत नाही."

- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT