Rummy Rajput esakal
नाशिक

SAKAL Impact: रम्मी राजपूतला तडकाफडकी ‘डिस्चार्ज’! पुन्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : आनंदवलीतील रमेश मंडलिक यांच्या खूनप्रकरणात मोकान्वये अटक असलेला रम्मी राजपूत गेल्या काही आठवड्यांपासून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली ऐषआरामात राहत होता.

एका कॅबिनेट मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे रम्मी राजपूत याची बडदास्त ठेवली जात होती. परंतु यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हा शल्यचिकित्सकांनी रम्मी राजपूत याला तडकाफडकी डिस्चार्ज करीत त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पुन्हा रवानगी केली आहे. (SAKAL Impact Rummy Rajput hastily discharged Again sent to Central Jail nashik)

सकाळचे वृत्त

आनंदवलीतील जमिनीच्या प्रकरणातून १७ फेब्रुवारी २०२१ रोजी रमेश मंडलिक यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखेने तपास करीत खुनाची उकल केली होती.

यात भूमाफियांची मोठी टोळीच पोलिसांनी गजाआड केली. यात भाजपचा पदाधिकारी आणि एका कॅबिनेट मंत्र्यांशी जवळीक असलेल्या रम्मी राजपूत यास पोलिसांनी गुन्ह्यानंतर सहा महिन्यांनी हिमाचल प्रदेशातून अटक केली होती.

याप्रकरणातील संशयितांविरोधात मोका लावण्यात आलेला आहे. असे असतानाही, रम्मी राजपूत हा गेल्या तीन आठवड्यांपासून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठदुखीच्या कारणावरून वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली ऐषआरामात राहत होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रम्मीला जिल्हा रुग्णालयात विद्यमान सरकारातील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या आदेशानुसार दाखल करून घेण्यात आलेले होते. त्याचा बर्थ डेही मोठ्या थाटात याच जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात आला होता.

यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’मधून मंगळवारच्या अंकात (ता. १८) प्रसिद्ध झाली. सदर वृत्त प्रसिद्ध होताच, जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. मात्र, या प्रकारामुळे पुन्हा राजकीय नेते आणि गुन्हेगार यांच्यातील संबंध अधोरेखित झाले असून, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

‘सकाळ’ मधील ‘रम्मी राजपूत सिव्हिलमध्ये दाखल’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच, जिल्हा शल्यचिक्सिकांनी गांभीर्य ओळखून ऐषआरामात गेल्या काही आठवड्यापासून राहणाऱ्या रम्मी राजपूत यास तत्काळ डिस्चार्ज करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रम्मीची पुन्हा नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT