SAKAL Impact esakal
नाशिक

SAKAL Impact : 3 टँकरद्वारे पाथर्डी भागात पाणीपुरवठा! पाइपलाइनसाठी पुन्हा मोजमाप

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : ‘पाथर्डी फाटा भागात पाण्यासाठी वणवण’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर मनपा प्रशासन सोमवारी (ता. ८) ॲक्शन मोडमध्ये आले. पाणीपुरवठा विभागातर्फे तीन टँकरद्वारे येथे पाणीपुरवठा करण्यात आला.

सायंकाळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गोकुळ पगारे आणि सहकाऱ्यांनी या ठिकाणी अंदाजे किती मीटर पाण्याची लाईन टाकावी लागेल याचेदेखील पुन्हा मोजमाप केले. (SAKAL Impact Water supply to Pathardi area through 3 tankers Remeasurement for pipelines nashik news)

येथे दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. येथील रहिवाशांवर विकत पाणी येण्याची वेळ आली होती. त्यामुळे त्यांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. सर्वे क्रमांक २२४ मध्ये धोंगडे पाटीलनगर येथे ही रो- हाऊसेस आहेत.

येथील सर्व बोअरवेल कोरडेठाक पडल्याने नागरिकांची वणवण सुरू आहे. टँकरद्वारे सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यामुळे येथील रहिवासी सुखावले असले तरी कायमस्वरूपी हा प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान ‘सकाळ’ वृत्ताबद्दल रितेश शेलार, सचिन वाजे, किरण पाटील, शुभम डांगे, माधुरी पाटील, माधव मोरे, मयूरी वाजे, ललिता खोडे, अतुल पाटील, शरद केदारे, यश मिश्रा, विशाल झोपे, रविकिरण कुशवाह, उदय महाजन, किरण पाटील, विकास परमार, अमोल देशमुख आदींनी ‘सकाळ’ चे आभार मानले आहे.

हा संपूर्ण परिसर नव्याने विकसित होत आहे. या ठिकाणी पक्के रस्तेदेखील नाहीत. पावसाळ्यात तर येथे चालणेदेखील मुश्कील होणार आहे. मात्र त्यातल्या त्यात कमी किमतीत घरे मिळत असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांची पसंती या भागाला मिळत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याच प्रकारची मोठी डेव्हलपमेंट पाथर्डी गावातून गौळाणेकडे जाताना एसएसके वर्ल्ड क्लबच्या परिसरात दिसून येत आहे. या भागातदेखील अगदी पांडव लेणीच्या डोंगराच्या मागच्या बाजूच्या पायथ्यापर्यंत रो- हाऊसेस आणि इमारतींचे बांधकामे होताना दिसत आहेत.

दररोज नवे गृहप्रकल्प येथे सुरू होत आहेत. या सर्व बाबींची दखल घेत महापालिकेने तातडीने या भागासह इतरत्र होत असलेल्या वसाहतींमधील नागरिकांना वीज, पाणी, ड्रेनेज आणि रस्ते या मूलभूत सुविधा पुरविण्याची गरज झाली आहे.

"अमृत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुमारे २४० कोटी रुपये निधीतून जलवाहिनीची कामे व्हावीत यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय या भागातील गौळाणे, विल्होळी आणि एक्स्प्रेस इन हॉटेलच्या मागील बाजूने पाथर्डीकडे जाणारे आणि मंजूर असणारे डीपी रस्ते, अंतर्गत १२ मीटर आणि ९ मीटरच्या सर्वच सुमारे १ लाख चौ. किमी म्हणजे सुमारे १० किमी लांबी असणाऱ्या या रस्त्यांच्या कामालादेखील सुरवात होणार आहे."- सुदाम डेमसे, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Cricketer Death : भारताच्या क्रिकेटपटूचा मृत्यू! फलंदाजी करून परतत असताना जमिनीवर कोसळला, तडफडला अन्...; वाचा दुर्दैवी घटना

Nilanga News : आधार कार्डमधील विसंगतीचा विद्यार्थ्यांना फटका; निलंग्यात सात हजार ८३४ विद्यार्थी ‘अपार’ आयडीविना

ठरलं तर मग फेम अभिनेत्री गेली 17 वर्षं करतेय या आजाराचा सामना; "माझी ऐकू येण्याची क्षमता.."

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

SCROLL FOR NEXT